त्याचं झालं असं की, घरी आल्यानंतर अमित शाह यांनी आपल्या नातीला उचलून घेतलं. नातीने पांढऱ्या रंगाची हॅट घातली होती. पण अमित शाह तिची हॅट काढून तिला भाजपची टोपी घालत होते. परंतु वारंवार प्रयत्न करुनही नातीने ती टोपी घालण्यास नकार दिला. अखेर तिने भाजपची टोपी नाकारुन आवडती पांढरी हॅटच घातली. अमित शाह आणि त्यांच्या नातीचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान यांचा समावेश आहे.
अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी आपल्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर नारणपुरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. इथे अमित शाह सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल.
VIDEO | भाजपची टोपी घालण्यास शाहांच्या नातीचा नकार