वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक, भव्य दिव्य असा रोड शो सुरु झाला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रोड शोला सुरुवात केली. रोड शोनंतर मोदी गंगेकाठी आरती करतील.

या रोडशोमध्ये एनडीएतले अनेक घटक पक्ष सहभागी झाले आहेत. या रोड शोसाठी जय्यत तयारी करण्यात आली होआहे. उद्या वाराणसीतून नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्याआधी या रोड शोच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.

VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भव्य रोड शो दरम्यान 25 क्विंटल गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव | एबीपी माझा



बनारस हिंदू युनिव्हर्सिटीपासून ते दशाश्वमेध घाटापर्यंतच्या सात किलोमिटरपर्यंत हा रोड शो आहे. या रोड शोच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह स्वतः जातीनं लक्ष घातलं आहे. या रोड शो साठी रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेट्स लावले गेले आहेत. शहरात मोदींच्या स्वागताचे फलक जागोजागी लावले गेले आहेत. या रोड शो दरम्यान 25 क्विंटल गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

पंतप्रधान मोदींच्या या रोड शो आधीच भाजप नेत्यांकडून आधीच पंतप्रधान मोदी आपल्या मतदारसंघातून निवडून जाणं हे मतदारसंघासाठी भूषणावह असल्याचा प्रचार केला जातोय. तसेच विकासाचे दावेही केले जात आहेत. वाराणसी हा गेल्या काही वर्षापासून भाजपचा गड मानला जातोय. यंदाही विजय आपलाच, असा दावा करत या भव्य रोडशोचं आयोजन करण्यात आलं आहे.

VIDEO | पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, वाराणसीतील मराठी जनतेला काय वाटतं? | एबीपी माझा