राज ठाकरेंनी तुमच्या मतदारसंघात सभा घ्यावी का? तुमची इच्छा काय? असा प्रश्न विचारल्यावर 'कोण कुठे सभा घेईल हा ज्याचा त्याचा प्रश्न. जे लोक मोदी सरकारला पाडायचा संकल्प करत आहेत, त्यांनी आघाडीला सहयोग दिला पाहिजे.' असं उत्तर निरुपम यांनी दिलं.
राज ठाकरेंच्या सभांविषयी प्रश्न विचारल्यावर निरुपम म्हणाले, 'मला इरिटेट करु नका. सारखी सारखी मनसेची रेकॉर्ड चालवू नका. माझा जीव राहू द्या ना. कोण कुठे सभा घेईल हा ज्याचा त्याचा प्रश्न. माझी मनसेबद्दल काही नाराजी नाही, त्यांच्या सभांना विरोध नाही' असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
संजय निरुपम हे काँग्रेसकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर त्यांच्याविरोधात रिंगणात आहेत. मनसैनिकांना भाजप-शिवसेनेविरोधात प्रचार करण्याचे राज ठाकरेंचे आदेश आहेत. मात्र उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरुन संजय निरुपमांविषयी मनसैनिकांमध्ये मोठा रोष आहे. त्यामुळे उत्तर-पश्चिम मुंबईत मनसेविरोधाचा फॅक्टर निरुपमांना साहजिकच इरिटेट करणारा आहे.
निरुपम-किर्तीकर यांच्यात लेटर वॉर, एकमेकांना पत्र लिहून आव्हान-प्रतिआव्हान
मनसैनिकांचा सहयोग आपल्याला मिळत नाही अशी चर्चा असल्यावरुन संजय निरुपम यांना छेडण्यात आलं. त्यावर 'जाऊ द्या तो विषय आमचा नाही. मनसेच्या विषयावर मी आता जास्त बोलत नाही. कोणाचा विरोध नाही, निषेध नाही. सध्या मी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं आहे.' असं निरुपम म्हणाले.