बुधवारी राज ठाकरेंनी भांडुपमध्ये सभा घेतली होती. त्यात त्यांनी युतीवर आरोप केले. आज (गुरुवार) आदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटकसाठी प्रचार रॅली काढत रोड शो केला. यात त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
VIDEO | ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला | मुंबई | एबीपी माझा
संपूर्ण महाराष्ट्रात भगवं माहोल आहे. जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, लोक ही दोन बटनं सोडून दुसरी कोणतीही बटणं दाबत नसल्याचं मतं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच जनतेला सत्ताधारी पक्षचं हवा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. नुसती ईशान्य मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईत सेना-भाजपचं उमेदवार निवडूण येतील असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
तसेच याआधीही आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या NSUI मध्ये पार पडलेल्या आदित्यसंवाद या कार्यक्रमात राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आज भाजपसोबत युती केली, भविष्यात मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष आणि काका राज ठाकरेंना त्यांनी टोला लगावला.
'आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही' असं म्हणत मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर पुतण्याने काकाला टोला हाणला.
VIDEO | ... जेव्हा आदित्य ठाकरे क्लीन बोल्ड होतात | मुंबई | एबीपी माझा
संबंधित बातम्या
मनसेसोबत युती करणार का? तरुणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात...
'निलेश राणे' नाव ऐकून आदित्य ठाकरे म्हणाले 'अरे बापरे'
पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत त्यांच्या सभा, प्रचाराला जाणार नाही : युवासेना
पार्थ, सुजयनंतर आता आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात