नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल जवळपास एनडीएच्या पारड्यात झुकताना दिसतं आहे. आत्तापर्यंतच्या प्राथमिक कलानुसार भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एनडीएला मोठी आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन बनणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतच्या निकालानुसार मोदी सरकारने आपला 2014 चा विक्रम मोडीत काढला आहे. तर यूपीएला 100चा आकडासुद्धा पार करता आलेला नाही.


भाजपने एकट्याच्या जोरावर 292 जागा जिंकत असून काँग्रेस 50 जागा जिंकतील असं चित्र आहे. एनडीए सरकारच्या या विजयामागे मोदी फॅक्टर कारणीभूत ठरला आहे. 2014 मध्ये मोदी लाट असल्याचं बोललं जात होत मात्र या वेळी तर त्सुनामी असल्याचे बोलले जात आहे. एनडीए सरकारच्या या विजयामागची पाच प्रमुख कारणे:

चेहरा

2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींशिवाय कुणीही दुसरा उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य नसल्याचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे “मोदी नही तो कौन?” या वाक्यावर भापकडून मतं मागण्यात आली. देशभरात एनडीएकडून सगळ्या जागांवर मोदींसाठीच मतदान मागण्यात आलं. त्यामुळे भाजपला या प्रचाराचा फायदा झाल्याचं निकालाच्या कलांमधून समोर येतं आहे.

तर 201 9 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून कोणताही चेहरा समोर केला गेला नाही.  त्याचवेळी भाजप-एनडीएने एक मजबूत चेहरा म्हणून पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिला आणि जनतेने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली.

Loksabha Result | लोकसभेच्या निकालापूर्वीच भाजपचं सेलिब्रेशन | कौल मराठी मनाचा | ABP Majha



आक्रमक प्रचार

2019च्या लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 150 रोड शो आणि रॅली घेतल्या. यासह भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान यांसारख्या बडे नेते देखील रोड शो आणि रॅलींमध्ये सहभागी झाले होते. देशभरात भाजपकडून जवळपास 1000हून जास्त रोड शो, सभा घेण्यात आल्या. तसेच प्रत्येक प्रचारात भाजपकडून विरोधकांकडून आक्रमक प्रचार करण्यात आला.

राष्ट्रवाद

निवडणुकीच्या घोषणेच्या एक महिन्याआधी 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पाकिस्तानी अतिरेक्यांनी देशावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुखावला होता. देशभरातून या घटनेचा बदला घेण्याची प्रतिक्रिया सर्व स्थरांतून होत होती. याचवेळी 26 फेब्रुवारीच्या रात्री एका गुप्त ऑपरेशनमध्ये भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यातील 250 आतंवादी मारल्याचा दावा करण्यात आला.

त्याचबरोबर भारताचे पायलट अभिनंदन वर्धमान यांचं पाकिस्तानातून सुरक्षित भारतात परतणे, या सर्व घटनांचा फायदा मोदी सरकार झाला. तसेच बालाकोट यांसारख्या मुद्द्यांचा फायदा देखील प्रचारादरम्यान भाजपला झाला.

महागाई आणि भ्रष्टाचार

सामान्य जनतेला प्रभावित करणारे दोन मुद्दे महागाई आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे या निवडणुकीत फारसे प्रभावित करु शकले नाहीत. काही महिन्यांपूर्वी पेट्रोलच्या किंमती सोडल्यास मोदी सरकारविरोधात महागाईचा भडका उडाला नाही. सरकारचा दावानुसार भाजपच्या कार्यकाळात चलनवाढ नियंत्रणाखाली असल्याचा दावा करण्यात आला आणि याचाच फायदा 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारला होताना आपल्याला दिसतं आहे.

तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर काँग्रेसने जोरदार प्रचार केला पण त्याचा फारसा फरक निकालात पडला नाही. राफेलच्या मुद्दावर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आलं पण सुप्रिम कोर्टाकडून सरकारला क्लीन चीट देण्यात आली. तसेच या निवडणुकीत चौकीदार चोर है चे नारेसुद्धा गाजले. योजना मोदी सरकारने सामान्य लोकांना प्रभावित करणाण्यासाठी चार प्रमुख योजनां आणल्या आणि याचाच उल्लेख जास्तकरुन या निवडणुकीत करण्यात आला. यात स्वच्छता अभियान, किसान सम्मान निधि योजना, सौभाग्य योजना आणि उज्जवला योजना या योजनांचा समावेश आहे. तसेच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. त्यात वर्षांला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळण्याची योजना गाजली.

Loksabha Result | राजकीय विश्लेषक विनय सहस्त्रबुद्धे यांचं लोकसभा निकालाचं विश्लेषण | कौल मराठी मनाचा | ABP Majha