Shiv Sena UBT Candidate Results 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नवे नाव आणि चिन्हासह मैदानात उतरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचे चित्र आहे. मुंबईवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकहाती वर्चस्व कायम ठेवताना लढवलेल्या चारही जागांवर विजय मिळवला.  धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाखांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. 

पक्षफुटीनंतर नव्याने राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने 21 जागांवर उमेदवार उभे केले होते. राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सर्वाधिक उमेदवार हे ठाकरे गटांचे आहेत. त्यामुळे ठाकरे गटांच्या उमेदवारांच्या कामगिरीवर सगळ्यांचे लक्ष लागले होते.  शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांविरोधात 13 मतदारसंघात उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोणाचा विजय होणार, याकडेही राज्याचे  लक्ष लागले आहे.  पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने पक्ष बांधणी केली. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले राज्यातील 18 खासदारांपैकी 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत शिंदे गटात प्रवेश केला.  

शिवसेना ठाकरे गटाच्या 21 उमेदवारांचा निकाल काय?

 

लोकसभा मतदारसंघउमेदवाराचे नावनिवडणूक निकाल
बुलढाणानरेंद्र खेडेकरपराभव
यवतमाळवाशिमसंजय देशमुखविजयी 
मावळसंजोग वाघेरे पाटीलपराभूत
सांगलीचंद्रहार पाटीलपराभूत
हातकणंगलेसत्यजित पाटील पराभूत
हिंगोलीनागेश पाटील आष्टीकरविजयी
छत्रपती संभाजीनगरचंद्रकांत खैरेपराभूत
धाराशिवओमराजे निंबाळकरविजयी
शिर्डीभाऊसाहेब वाघचौरेविजयी
नाशिकराजाभाई वाजेविजयी
रायगडअनंत गीतेपराभूत
सिंधुदुर्गरत्नागिरीविनायक राऊतपराभूत
ठाणेराजन विचारेपराभूत
मुंबई ईशान्यसंजय दिना पाटीलविजयी
मुंबई दक्षिणअरविंद सावंतविजयी
मुंबई वायव्यअमोल कीर्तिकरपराभूत
परभणीसंजय जाधवविजयी
मुंबई दक्षिण मध्यअनिल देसाईविजयी
वैशाली दरेकरकल्याणपराभूत
करण पवारजळगावपराभूत
भारती कामडीपालघरपराभूत