Sunil Tatkare on Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसला आहे. महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाले सुनील तटकरे? 


देवेंद्र फडणवीस आज सर्वात प्रमुख नेते आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धूरा सांभाळली आहे. ते मुख्यमंत्री देखील झाले. त्यामुळं जे अपयश आले. त्यामुळे ते व्यतीत झाले असतील. त्यामुळे ते बोलले असावेत ॲाक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणूकामुळे त्यांनी म्हटलं असेल. भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे देवेंद्रजी यांनी नैतिकतेनं जबाबदारी सांभाळून बोलले असतील, असे सुनील तटकरे म्हणाले.  


प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेणार


अमोल मिटकरी यांचे वक्तव्य बारामती पुरते मर्यादीत असावे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती आणि मतदारसंघातील आढावा घेतला जाईल. बहुमत सिद्ध करण्यासाठी 272 ची आवश्यकता असते 240 आकडे असलेले सरकार स्थापन करू शकत नाही. महायुतीने सगळीकडे काम व्यवस्थित आहे. मध्यंतरी राज्यभरातील घडामोडी झाल्या त्या भावना लोकांच्या मनात होत्या. आम्ही प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेणार आहोत, असे तटकरे म्हणाले.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294


इंडिया आघाडी- 232


इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29


महायुती- 18


अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9


शिवसेना (शिंदे गट)-7


राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13


ठाकरे गट-9


शरद पवार गट-8


आणखी वाचा 


मित्र पक्षांसमवेत समन्वयाचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत; महायुतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान, 'चर्चा तर होणार'