नवी दिल्ली : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं होतं. सोळाव्या लोकसभेची मुदत 3 जून 2019 रोजी संपते. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत.

पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
मतमोजणी : 23 मे 2019

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या तारखा

पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान

दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान

तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान

चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान

कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान

पहिला टप्पा - 11 एप्रिल - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार

दुसरा टप्पा - 18 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी,

तिसरा टप्पा - 23 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव

चौथा टप्पा - 29 एप्रिल - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

पाचवा टप्पा - 6 मे - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

सहावा टप्पा - 12 मे - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल

सातवा टप्पा -  19 मे - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल

प्रत्येक टप्प्यात किती जागांवर मतदान (राज्यानुसार आकडेवारी)

पहिला टप्पा - (91)

आंध्र प्रदेश - 24
अरुणाचल प्रदेश - 2
आसाम - 5
बिहार - 4
छत्तीसगढ - 1
जम्मू काश्मिर - 2
महाराष्ट्र - 7
मणिपूर-1
मेघालय - 2
मिझोराम - 2
नागालँड-1
ओदिशा - 4
सिक्कीम - 1
तेलंगणा- 17
त्रिपुरा- 1
उत्तर प्रदेश - 8
उत्तराखंड - 5
पश्चिम बंगाल - 2
अंदमान निकोबार - 1
लक्षद्वीप - 1

दुसरा टप्पा - (97)

आसाम - 5
बिहार - 5
छत्तीसगड - 3
जम्मू काश्मिर - 2
कर्नाटक - 14
महाराष्ट्र - 10
मणिपूर - 1
ओदिशा - 5
तामिळनाडू - 39 (सर्व)
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश - 8
पश्चिम बंगाल - 3
पुदुच्चेरी - 1

तिसरा टप्पा - (115)

आसाम - 4
बिहार - 5
छत्तीसगड - 7
गुजरात - 26
गोवा - 2
जम्मू काश्मिर - 1
कर्नाटक- 14
केरळ - 20
महाराष्ट्र - 14
ओदिशा - 6
उत्तर प्रदेश- 10
पश्चिम बंगाल - 5
दादरा नगर  - 1
दमण - दीव - 1

चौथा टप्पा (71)

बिहार - 5
जम्मू काश्मिर - 1
झारखंड - 3
मध्य प्रदेश - 6
महाराष्ट्र - 17
ओदिशा - 6
राजस्थान - 13
उत्तर प्रदेश - 13
वेस्ट बंगाल - 8

पाचवा टप्पा (51)

बिहार - 5
जम्मू काश्मिर - 2
झारखंड - 4
मध्य प्रदेश - 7
राजस्थान - 12
उत्तर प्रदेश - 14
पश्चिम बंगाल - 7

सहावा टप्पा (59)

बिहार 8
हरियाणा 10
झारखंड - 4
मध्य प्रदेश - 8
उत्तर प्रदेश - 14
पश्चिम बंगाल - 8
दिल्ली - 7

सातवा टप्पा (59)

बिहार - 8
झारखंड - 3
मध्य प्रदेश - 8
पंजाब -  13
पश्चिम बंगाल - 9
चंदिगढ - 1
उत्तर प्रदेश - 13
हिमाचल प्रदेश- 4


निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  LIVE UPDATE


- चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान

- तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान

- दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान

- पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान

- महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार

- बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी सात टप्प्यांमध्ये मतदान

- आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान, दादरा नगर हवेली, दमन आणि द्वीप, लक्षद्वीप, दिल्ली, पुदुच्चेरी, चंदिगढ़ या राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान

पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं
मतमोजणी : 23 मे 2019

- 23 मे 2019 रोजी मतमोजणी

- 19 मे रोजी सातवा आणि अखेरचा टप्पा

- 11 एप्रिलपासून पहिला टप्पा

- देशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार

- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2019

-----------------------------------

- फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर, पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर

- इव्हीएमची मूव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर केला जाईल

- मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार

- निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.

- मतदानाच्या 48 तास आगोदर लाऊड स्पीकरची परवानगी नसेल

- रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही

- लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, देशभरात आचारसंहिता लागू, आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई


- ईव्हीएमवर मतदाराचा फोटो असणार, सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशिन, दहा लाख पोलिंग बूथ


- ओळखपत्रासाठी 11 पर्याय ठेवले आहेत

- 1950 या टोल फ्री क्रमांकावर मतदानाशी निगडीत सर्व माहिती मतदारांना मिळणार, अॅपवरही तक्रारीची सुविधा

- देशातील मतदार 90 कोटीच्या घरात, 2014 च्या तुलनेत सात कोटींनी वाढ, 18-19 वर्षे वयोगटातील दीड कोटी, तर 1.60 कोटी नोकरदार मतदार

- सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षा, धार्मिक सण-उत्सव यांचा विचार करुन लोकसभा निवडणुकांच्या तारखांचं वेळापत्रक

- निवडणुकांच्या तयारीला लवकर सुरुवात, सर्व राजकीय पक्षांशी चर्चा, मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांची माहिती

----------------------

रविवार असल्यामुळे आज निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी मानली जात होती. मात्र 2004 सालच्या लोकसभा निवडणुकाही रविवारी, म्हणजेच 29 फेब्रुवारी 2004 रोजी जाहीर झाल्या होत्या.

लोकसभा निवडणुका नियोजित वेळेनुसारच होणार, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा निवडणुकांवर काही परिणाम होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावर 'देशातील लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील' असं उत्तर अरोरा यांनी दिलं.

संबंधित बातम्या :


लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल