Latur Rural Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. अशातच आज आपण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची (Latur Rural Vidhansabha Election) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांच्या विरोधात भाजपकडून रमेश कराड (Ramesh Karad) रिंगणात उतरले आहे. त्यामुळं ही लढत रंगतदार होणार आहे.
2019 च्या निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा लातूर जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचे डॉ शिवाजी काळगे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला होता. तर 20219 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसेच धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुखांचा पराभव केला होता. या मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना 1 लाख 31 हजार 321 मतांना विजयी झाले आहेत. त्यांनंतर नोटाला 26,899 मतं मिळाली आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या सचिन देशमुख यांना 13113 मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार बळीराम डोने यांना येथे 12,670 मतं मिळाली आहे.
विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार, रमेश कराडांचा निश्चय
तीन वेळेस जोरदार तयारी करणाऱ्या रमेश कराड यांच्या पदरी निराशाच आली होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षांने त्यांना विधान परिषदेतून आमदार केलं. मात्र, आता कुस्तीचा फड रंगणारच आणि विरोधकांना चितपट करत कुस्तीचा फड आम्हीच जिंकणार असा निश्चिय कराड यांनी केला आहे. भाजपनं त्यांना यावेळी उमेदवारी दिल्यानं त्यांनी तयारी सुरु केली आहे.
यावेळी नेमकं काय होणार?
यावेळच्यी निवडणूक जरा वेगळ्या प्रकारची होत आहे. कारण शिवसेनेत फूट पडली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळं मतांचं मोठ्या प्रमाणात विाजन देखील झालं आहे. आता याचा फायदा नेमका कोणाला होणरा हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या: