Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Kolhapur District Assembly Constituency Election Result 2024) मतमोजणीला प्रारंभ झाला असून महायुतीच्या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आघाडी घेतली आहे. कागलमध्ये सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या लढतीमध्ये हसन मुश्रीफ यांनी 2400 मतांची आघाडी घेतली आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे राहुल आवाडे सहा हजार 923 मतांनी आघाडीवर आहेत. राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र चुरशीची लढत सुरू असून पोस्टल मतदानामध्ये काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांनी आघाडी घेतली होती. मात्र, आता ईव्हीएम मतमोजणीमध्ये ऋतुराज पाटील हे पिछाडीवर पडले आहेत. सुरुवातीला कोल्हापूर शहरांमधील मतमोजणी होत असून कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक 2612 मतांनी आघाडीवर आहेत. 


शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरी अखेर राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर आहेत. दरम्यान शाहूवाडीमध्ये सुद्धा धक्कादायक परिस्थिती असून सुरुवातीच्या कलांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरूडकर आघाडीवर आहेत. चंदगडमध्ये सुद्धा लढत निकराची होत असून या ठिकाणी पंचरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार? अशी चर्चा असतानाच बंडखोर भाजप उमेदवार शिवाजी पाटील 1025 मतांनी आघाडीवरती आहेत दरम्यान करवीमध्ये सुद्धा पहिल्या फेरीनंतर चित्र स्पष्ट झालं असून करवीरमधून राहुल पाटील 2000 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान हातकणंगले मधून काँग्रेसला धक्का बसला असून पहिल्या फेरीमध्ये महायुतीचे सहयोगी उमेदवार अशोकराव माने आघाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 



  • कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर 4200 मतांनी आघाडीवर 

  • राधानगरी मधून प्रकाश अबिटकर 2995 आघाडीवर 

  • कागलमधून हसन मुश्रीफ 2400 मतांनी आघाडीवर 

  • इचलकरंजी मधून राहुल आवाडे 6923 मतांनी आघाडीवर 

  • कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक 2612 आघाडीवर 

  • शिरोळ मधून राजेंद्र पाटील यड्रावकर (पहिली फेरी)

  • शाहूवाडी सत्यजित पाटील आघाडीवर 

  • चंदगडमधून शिवाजी पाटील 1025 मतांनी आघाडीवर 

  • करवीरमधून राहुल पाटील 200 मतांनी आघाडीवर (पहिली फेरी)

  • हातकणंगले मधून अशोकराव माने  मतांनी आघाडीवर (पहिली फेरी )



 इतर महत्वाच्या बातम्या