मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती ढवळून काढणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदु ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन राज्यातील 288 मतदारसंघातील कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती.  मात्र, मुख्य लक्ष शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला (Shinde Camp) बहाल केले होते. मात्र, तरीही खरी शिवसेना आमचीच ही गोष्ट नागरिकांच्या मनावर बिंबवण्यात शिंदे गट पूर्णपणे यशस्वी ठरला नव्हता. उद्धव ठाकरे यांनीही, 'खरी शिवसेना आमचीच, दुसरा शिवसेना पक्ष असूच शकत नाही', असे वारंवार सांगितले होते. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा फैसला करण्यासाठी विधानसभेची आमनेसामने होणारी लढाई ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 51 मतदारसंघात ठाकरे गट (Thackeray Camp) आणि शिंदे गटाचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये मुंबई महानगर परिसरातील 19, मराठवाडा आणि कोकणातील 8, विदर्भातील 6, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 4 जागांचा समावेश होता.  आगामी मुंबई महानगरपालिकेच्यादृष्टीने शिंदे गट आणि ठाकरे गटात थेट लढत होणाऱ्या मुंबईतील 12 जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मतदारसंघविजयी उमेदवारशिवसेना (शिंदे)शिवसेना (ठाकरे)
मागाठाणेप्रकाश सुर्वेप्रकाश सुर्वेउदेश पाटेकर
भांडुप पश्चिमअशोक पाटीलअशोक पाटीलरमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्वअनंत नरमनीषा वायकरअनंत नर
दिंडोशीसुनील प्रभूसंजय निरुपमसुनील प्रभू
चेंबूरतुकाराम कातेतुकाराम कातेप्रकाश फातर्पेकर
माहीममहेश सावंतसदा सरवणकरमहेश सावंत
भायखळामनोज जामसुतकरयामिनी जाधवमनोज जामसुतकर
वरळीआदित्य ठाकरेमिलिंद देवराआदित्य ठाकरे
विक्रोळीसुनील राऊतसुवर्णा कारंजेसुनील राऊत
कुर्लामंगेश कुडाळकरमंगेश कुडाळकरप्रविणा मोरजकर
अंधेरी पूर्वमुरजी पटेलमुरजी पटेलऋतुजा लटके
कुडाळनिलेश राणेनिलेश राणेवैभव नाईक
रत्नागिरीउदय सामंतउदय सामंतबाळा माने
राजापूरकिरण सामंतकिरण सामंतराजन साळवी
सावंतवाडीदीपक केसरकरदीपक केसरकरराजन तेली
महाडभरत गोगावलेभरत गोगावलेस्नेहल जगताप
दापोलीयोगेश कदमयोगेश कदमसंजय कदम
गुहागरभास्कर जाधवराजेश बेंडलभास्कर जाधव
कर्जतमहेंद्र थोरवेमहेंद्र थोरवेनितीन सावंत
पालघरराजेंद्र गावितराजेंद्र गावितजयेंद्र दुबळा
अंबरनाथबालाजी किणीकरबालाजी किणीकरराजेश वानखेडे
बोईसरविलास तरेविलास तरेविश्वास वळवी
भिवंडी ग्रामीणशांताराम मोरेशांताराम मोरेमहादेव घाटाळ
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईरसचिन बासरे
कल्याण ग्रामीणराजेश मोरेराजेश मोरेसुभाष भोईर
ओवळा माजिवडाप्रताप सरनाईकप्रताप सरनाईकनरेश मनेरा
कोपरी पाचपाखाडीप्रताप सरनाईकएकनाथ शिंदेकेदार दिघे
छत्रपती संभाजीनगर पश्चिमसंजय शिरसाटसंजय शिरसाटराजू शिंदे
छत्रपती संभाजीनगर मध्यप्रदीप जैस्वालप्रदीप जैस्वालबाळासाहेब थोरात
परभणी आनंद भरोसेराहुल पाटील
सिल्लोडअब्दुल सत्तारअब्दुल सत्तारसुरेश बनकर
पैठणविलास भुमरेविलास भुमरेदत्ता गोर्डे
कन्नडसंजना जाधवसंजना जाधवउदयसिंह राजपूत
वैजापूररमेश बोरनारेरमेश बोरनारेदिनेश परदेशी
धाराशिव अजित पिंगळेकैलास पाटील
उमरगा ज्ञानराज चौगुलेप्रवीण स्वामी
कळमनुरीसंतोष बांगरसंतोष बांगरसंतोष टारफे
चोपडा चंद्रकांत सोनवणेप्रभाकर सोनवणे
नांदगावसुहास कांदेसुहास कांदेगणेश धात्रक पाचोरा
मालेगाव बाह्यदादा भुसेदादा भुसेअद्वय हिरे
बार्शीदिलीप सोपलराजेंद्र राऊतदिलीप सोपल
सांगोलादीपक साळुंखेशहाजी पाटीलदीपक साळुंखे
राधानगरीप्रकाश आबिटकरप्रकाश आबिटकरके.पी पाटील पाटण
नेवासा विठ्ठलराव लंघेशंकरराव गडाख
बुलढाणासंजय गायकवाडसंजय गायकवाडजयश्री शेळके
मेहकरसिद्धार्थ खरातसंजय रायमूलकरसिद्धार्थ खरात
बाळापूरनितीन देशमुखबळीराम शिरसकरनितीन देशमुख
रामटेकआशीष जैस्वालआशीष जैस्वालविशाल बरबटे
दर्यापूरगजानन लवटेअभिजीत अडसूळगजानन लवटे
पाटणशंभूराज देसाईशंभूराज देसाईहर्षद कदम
पाचोराकिशोर पाटीलकिशोर पाटीलवैशाली सूर्यवंशी

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.