Amal Mahadik Net Worth : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज आणि राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लढत निश्चित झाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची लढत होत आहे. काल (24 आॅक्टोबर) गुरुपुष्पामृतच्या शुभ मुहूर्तावर आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे. या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. दरम्यान नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराजांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी पाटील यांच्यासाठी सुद्धा  लढत इतकी सोपी नसेल असे बोलले जात आहे. 


अमल महाडिकांच्या संपत्तीत पाच वर्षात किती कोटींनी वाढ झाली?


दरम्यान, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik Net Worth) यांची 23 कोटी 57 लाख रुपयांची मालमत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत पाच कोटी रुपयांनी संपत्ती वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 18 कोटी रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रात सादर केली होती. महाडिक यांची 9 कोटी 49 लाख रुपयांची जंगम तर 14 कोटी 7 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नी शौमिका महाडिक यांच्या नावावर 1 कोटी 44 लाख 64 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. महाडिक यांच्याकडे 467 ग्रॅम सोने आहे.  पत्नी शौमिका यांच्याकडे 200 ग्रॅम सोने आहे. त्यांच्या नावावर 53 लाख 85 हजार रुपयांचे चारचाकी वाहन आहे. 30 हजार रुपयांची दुचाकी आहे.


ऋतुराज पाटील यांची संपत्ती किती? 


ऋतुराज पाटील (Ruturaj Patil Net Worth) यांची 25 कोटी 18 लाख 53 हजार 8 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे. 23 कोटी 30 लाख 25 हजार 242 रुपये स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर दोन बँकांचे 26 कोटी 98 लाख 14 हजार 686 रुपयांचे कर्ज आहे. पाटील यांच्याकडे 4 कोटी 42 लाख 10 हजार 525 रुपये वारसाप्राप्त संपत्ती आहे. ऋतुराज पाटील यांच्या पत्नी पूजा यांच्या नावावर 67 लाख 62 हजार 706 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे.  2 कोटी 24 लाख 67 हजार इतकी स्थावर मालमत्ता आहे. मुलगा अर्जुनच्या नावावर 1 कोटी 51 लाख 97 हजार 582 रुपयांची जंगम तर 2 कोटी 61 लाख 58 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दुसरा मुलगा आर्यमनच्या नावावर 1 कोटी 32 लाख 65 हजार 624 रुपयांची जंगम तर 92 लाख 68 हजार 800 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या