बंगळुरु : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीला उद्यापासून सुरुवात होत आहे. निवडणुकीसाठी देशभरात प्रचार सुरु आहे. नेतेमंडळी प्रचारासाठी नवनवे फंडे वापरत नाहेत. कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री एमटीबी नागराज यांनीतर खूपच वेगळा फंडा वापरला आहे. प्रचारासाठी आयोजित केलेल्या रॅलीत नागराज प्रसिद्ध नागीण गाण्यावर थिरकले. या गाण्यावर त्यांनी नागीण डान्सच्या गल्ली-बोळात प्रसिद्ध असलेल्या स्टेप्स करुन उपस्थितांचे मनोरंजन केले.


काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या चिकबल्लापूर लोकसभा मतदारसंघातील काटीगनहल्ली या गावात एमटीबी नागराज हे प्रचारासाठी गेले होते. तिथे काँग्रेसकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बॅन्डपथकदेखील होते. रॅलीदरम्यान बॅन्डने नागीण गीताचे संगीत वाजवण्यास सुरुवात केल्यानंतर सर्व काँग्रेस कार्यकर्ते नाचू लागले. त्यामुळे एमटीबी नागराजदेखील काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागीण गाण्यावर नागीण डान्स करु लागले. 10 मिनिटे नागराज नागीण डान्स करत होते.

नागराज यांनी नागीण गाण्यावर नागीण डान्स केल्यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहा