Amit Shah : काँग्रेस (Congress) कडे निवडणूक लढवायला नेता नाही, म्हणून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उधार नेत्यांच्या जीवावर मैदानात उतरली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली. कर्नाटकातील बागलकोटमध्ये दुपारी 35 अंश तापमानात अमित शाह (Amit Shah) यांचे भाषण सुरू होते. यावेळी अमित शाहांनी काँग्रेससोबतच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला.
निवडणुकीसाठी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांवर ते अवलंबून आहेत, यातूनच काँग्रेसची दिवाळखोरी कळते असे अमित शाहा भाषणादरम्यान म्हणाले. यादरम्यान, भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या पराभवावरुनही शाहा यांनी निशाणा साधला आहे.
भाजपकडून तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी नुकताच पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हुबळी सेंट्रल विधानसभेतून काँग्रेसने शेट्टर यांना तिकीट दिले आहे. शेट्टर यांच्याशिवाय भाजपमधून आलेल्या लक्ष्मण सवदी यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
कर्नाटकात कोणत्या पक्षातील नेत्यांची पक्षांतरं?
कर्नाटकातील 224 जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसने उमेदवार जाहीर केले आहेत. जेडीएसने सर्वाधिक 28 पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे.
भाजपने इतर पक्षातून आलेल्या 17 नेत्यांना तिकीट दिले आहे. यात बहुतांश 2019 मध्ये ऑपरेशन लोटस दरम्यान भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते अनंत सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यालाही भाजपने तिकीट दिले आहे. अनंत सिंह हे बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधले मंत्री आहेत.
काँग्रेसने यावेळी पक्षांतर करणाऱ्यांना सर्वात कमी तिकिटे दिली आहेत. पक्षाने एकूण सहा तिकिटे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिली आहेत. शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांच्या नावांचाही यात समावेश आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.
पक्षांतर करणाऱ्यांमुळे तीन राज्यांत भाजपचे सरकार
गेल्या पाच वर्षात पक्षांतर करणाऱ्यांमुळे भाजपला तीन राज्यात सरकार बनवता आले. कर्नाटकमध्ये 2019 मध्ये प्रथमच भाजप काँग्रेस आणि जेडीएसमधील पक्ष बदलणाऱ्यांमुळे सत्तेत आला. कर्नाटकमध्ये जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते.
काँग्रेसचे 17 आमदार त्यावेळचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याविरोधात एकत्र आले आणि पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने कुमारस्वामी यांचे सरकार पडले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातही 2019 मध्येच काँग्रेसचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळे पडले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 27 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले.
कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळेच स्थापन झाले. 2022 मध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले.
काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.
संबंधित बातम्या: