Karnataka Election 2023: गेल्या काही काळापासून राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Comission) मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यावर भर देत असल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुक आयोग याच मुद्द्यांचा विचार करत कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार मुक्त निवडणूक होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत असल्याचं पहायला मिळत आहे. कर्नाटकात सध्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) राज्यातील बऱ्याच ठिकाणी छापेमारी (Raid) केली आहे. तसेच अहवालानुसार, या निवडणुकीच्या काळात करण्यात आलेल्या छापेमारीत 2018 विधानसभा निवडणुकांच्या तुलनेने 4.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कडेकोट बंदोबस्त तसेच आजूबाजूच्या राज्यांशी समन्वय साधत कर्नाटकातील निवडणुकांच्या काळात होणाऱ्या अवैध व्यापारावर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कर्नाटकामध्ये 375 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची नोंद झाली आहे. तसेच आचारसंहिता लागू केल्यानंतर कर्नाटकात 288 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
आतापर्यंत जप्त करण्यात आलेली मालमत्ता
रोख रक्कम - 147.46 कोटी
अमली पदार्थ - 23.67 कोटी
दारू - 83.66 कोटी
मौल्यवान गोष्टी - 96.60 कोटी
या निवडणुकीच्या काळात जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्ता - 375.61 कोटी
2018 विधानसभा निवडणूकीच्या काळात जप्त करण्यात आलेली मालमत्ता - 83.93 कोटी
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. तेव्हा ही निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडण्याचे आदेश आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या निवडणुकांची घोषणा करताना देखील निवडणुका मुक्त वातारणात पार पाडण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला होता.
कर्नाटकात निवडणुकांची रणधुमाळी
कर्नाटकातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंड झाल्या असून 10 तारखेला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत असले तरी कर्नाटकात सत्ता कुणाची येणार हे अवघ्या पाच दिवसात स्पष्ट होणार आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम असल्याने काँग्रेस, भाजप आणि जनता दल या तिन्ही पक्षांनी त्यांची ताकद लावली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Karnataka Election 2023: कर्नाटकासोबतच 'या' राज्यांमध्ये उद्या होणार मतदान; कशी आहेत 'या' राज्यातील समीकरण
- Karnataka Elections: कर्नाटकात निवडणुकीची आमिषं जोरात... बेळगावात मतदारांना वाटण्यासाठी आणलेले 1600 कुकर जप्त
- Karnataka Election : सीमावर्ती भागात 1.54 कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त; निवडणुकीसाठी पैसा वापरण्यात येण्याचा संशय