Deepak Kesarkar On Teachers Recruitment : "पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती (Teachers Recruitment) केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल," अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. तसंच आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असंही त्यांनी त्यांनी म्हटलं. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.


शिक्षक भरती संदर्भात दीपक केसरकर म्हणाले की, "नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच ही शिक्षक भरती करण्याचा आमचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल. शंभर टक्के शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल."


शिक्षकांच्या बदलीबाबत केसरकर म्हणाले...


शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.


शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.


'एकच युनिफॉर्मबाबतच्या निर्णयासंदर्भात एक-दोन दिवसात विचार करु'


तसंच विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करु आणि त्यानंतर ठरवलं जाईल, असं दीपक केसरकर यांनी स्षष्ट केलं. ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच  युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत.


संबंधित बातमी



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI