ऐश्वर्या रायनंतर लेकीच्या वाढदिवसालाही अभिषेक गैरहजर, आराध्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आले समोर

Aaradhya Bachchan Birthday Celebration : ऐश्वर्या रायने आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले असून या सेलिब्रेशन वेळी अभिषेक बच्चन गैरहजर होता.

Continues below advertisement

Aaradhya Birthday Celebration : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोरात आहेत. आता ऐश्वर्याने  तिच्या मुलीचा वाढदिवस एकट्याने साजरा केला. ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या बच्चनचे तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिषेक बच्चन गैरहजर होता. याआधी ऐश्वर्या रायच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपासूनही अभिषेक बच्चन लांब होता. ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतही तो पोहोचला नव्हता आणि आता आराध्याचा बर्थडे ऐश्वर्याने एकटीने सेलिब्रेट केला.

Continues below advertisement

ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या बच्चनचा वाढदिवस

आराध्या बच्चनच्या वाढदिवसाचे फोटो समोर आले आहेत. ऐश्वर्या बच्चनने सोशल मीडियावर आराध्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. ही पोस्ट शेअर करातान तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, 'तू अधिकृतपणे किशोरवयीन आहेस, आराध्या.' या फोटोमध्ये आई ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांच्या चेहऱ्यावरील आनंदी स्पष्ट दिसत होता.  या पोस्टमध्ये आराध्याच्या बालपणीच्या काही जुने फोटो शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये ऐश्वर्याने लेकीला प्रेमाने जवळ घेतल्याचं दिसत आहे.

लेक आराध्याच्या बर्थडेलाही अभिषेक गैरहजर

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बुधवारी, ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चनने दिवंगत वडील कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला. पण, या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती, यामध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही.

13 वर्षांची झाली आराध्या बच्चन 

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन 13 वर्षांची झाली आहे. 16 नोव्हेंबरला आराध्याचा वाढदिवस होता. आराध्याने तिचा वाढदिवस आई ऐश्वर्यासोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटो शेअर करताना ऐश्वर्याने लिहिलं आहे, "माझ्या आयुष्यातील दोन प्रेम, पापा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय, माझा आत्मा..." ऐश्वर्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिषेक आणि बच्चन कुटुंब दिसत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा, मुलगा आर्यनच्या जीवालाही धोका; काय आहे कनेक्शन?

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola