Kagal Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये घमसान सुरू आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अजित पवार गटाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवार देण्यात आला


या मतदारसंघांमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) दुरंगी लढत होईल असेच चित्र निर्माण झाले होते. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सद्धा उमेदवार देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पहिली 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कागल विधानसभा मतदारसंघातून रोहन निर्मळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कागलची निवडणूक आता तिरंगी होणार आहे. 2019 मध्ये सुद्धा कागलमध्ये तिरंगी निवडणूक झाली होती. मात्र, यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी उमेदवारीच्या रिंगणातून माघार घेत मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपला रामराम करत तुतारी फुंकली आहे. हसन मुश्रीफ आणि घाटगे यांच्यामध्ये चांगलंचं घमासान सुरू आहे. मुश्रीफ यांच्याकडून वैयक्तिक पातळीवर टीका होत असल्याने कागलमध्ये चांगलाच राजकीय वाद पेटला आहे.


मतविभागणीचा फायदा कोणाला होणार? 


दुसरीकडे, समरजित आणि हसन मुश्रीफ या दोघांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मदत केली नसल्याचा आरोप करत माजी खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांनी सुद्धा कागलच्या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र ते उमेदवारी अर्ज दाखल करतात का? याकडे लक्ष असेल. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये घाटगे अपक्ष रिंगणात होते. तरीसुद्धा त्यांनी हसन मुश्रीफ यांना जोरदार फाईट देत 88 हजारांवर मते घेतली होती. यावेळी घाटगे यांच्यामागे पक्षाची ताकद असल्याने त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं आहे. आता मनसेचा उमेदवार सुद्धा रिंगणात असल्याने तिरंगी लढतीमध्ये मतविभागणीचा फायदा कोणाला होणार याकडे सुद्धा लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या