Jitendra Awhad, कळवा मुंब्रा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघात पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. कळवा -मुंब्रा मतदार संघातील हिंदी भाषिक सेल च्या पदाधिकाऱ्यांनी केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.  पंकज पांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कळवा -मुंब्र्यातील पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय. 


प्रवेश पार पडल्यानंतर अजित पवारांचे प्रवक्ते काय म्हणाले? 


कळव्यातील उत्तर भारतीय प्रतिष्ठित पदाधिकारी यांचे स्वागत करतो. पकंज पाण्डे यांची कळवा हिंदी भाषिक सेल अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली, असा विश्वास आनंदर परांजपे यांनी व्यक्त केला. 


नजीब मुल्ला म्हणाले,  विरोधकांना कंटाळून अहंकाराच्या विरोधात तुतारीची साथ सोडून घड्याळ हातात घेतलं आहे.  काम हेच आमचं धर्म म्हणून आम्हाला साथ दिली. विजयाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न यांनी केला. दादागिरी सुरु आहे, डोंगरावरून येताना कार्यकर्त्यांना अडवत होते , पायाखालची वाळू सरकली आहे. येणाऱ्या काळात काय काय सरकेल हे बघा.


पुढे बोलताना आनंद परांजपे म्हणाले, कोणत्याही दहशतीला न घाबरता त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांनी सांगितल उत्तर भारतीय लोकांचे जितेंद्र आव्हाड यांनी शोषण केलं. आधी स्मशानभूमी कळवा पूर्व याठिकाणी करू शकला नाहीत. साधी छट पूजा शकला नाहीत. कायम सनातन धर्माचा अपमान करायचं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे.  


कब्रस्तानचे पाकीट कोण घेत , टोरंटचे पाकीट कोण घेत आहे. ज्यांच्यावर विनयभंग , 307 ची केस आहे त्यांनी बोलू नये. सध्या त्यांच्या पायाखालची वाळू इतकी सरकली. मेंदूमध्ये केमिकल लोचा त्यांच्या डोक्यात झाला आहे. एकीकडे विकासाचे खोटी स्वप्न त्यांनी दाखवली.  आज पंधरा वर्षानंतर तीच कळवा मुंब्राची जनता त्यांना प्रश्न विचारते.  


कुठल्याही प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हस्तेच्या समर्थन होऊ शकत नाही. पण इतिहासाचे खोटे दाखले द्यायचे या निवडणुकीमध्ये एकीकडे म्हणायचं की मी विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याची स्वतंत्रता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Manoj jarange: त्रास दिला त्याला पाडून बदला घ्यायचा; मनोज जरांगेंचा बीडमधून पहिला उमेदवार रिंगणात