Sagittarius Weekly Horoscope 04 To 10 November 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. नोव्हेंबरचा पहिलाच आठवडा असल्या कारणाने अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमच्या प्रेमजीवनात उत्साह आणणारा असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली असणार आहे. नात्यात सामंजस्य, गोडवा आणि विश्वास असेल. तसेच, तुमच्या मनातील भावना जोडीदाराबरोबर तुम्ही शेअर कराल. नात्यात संवाद साधाल तरच नातं टिकेल.
धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)
पैशांच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांनी सावध राहणं गरजेचं आहे. उगाच कोणावरही विश्वास ठेवून पैसे देऊ नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो.
धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)
धनु राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल मात्र, पैशांची जास्त उधळण करु नका. विनाकारण शॉपिंगवर पैसे खर्च करु नका.
धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)
धनु राशीच्या लोकांनी नोव्हेंबरच्या महिन्यात आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. वातावरणातील बदलामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला जाणवू शकतो. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ जसे की, तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :