Panchang 10 November 2024 : आज रविवार, 10 नोव्हेंबर रोजी चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शनिदेव आधीच विराजमान आहेत. याशिवाय आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची नववी तिथी असून या तिथीला अक्षय्य नवमीचा सण साजरा केला जातो, हा दिवस अक्षय्य तृतीयेप्रमाणे शुभ आणि फलदायी मानला जातो.
अक्षय्य नवमीच्या दिवशी ध्रुव योग, रवि योग आणि घनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
आजचा म्हणजेच अक्षय नवमीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज रविवारच्या सुट्टीमुळे घरातील कामं मार्गी लावण्याची संधी मिळेल. सूर्यनारायणाच्या कृपेने आज तुमची मनोकामना पूर्ण होईल. व्यापारी आपली व्यावसायिक कामं पूर्ण करतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे आणि तुम्ही त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही करू शकता. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील. संध्याकाळी काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुमच्या स्वभावात खेळकरपणाही असेल, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्यावर खूप खुश असतील. आज तुम्ही तेच काम करा जे तुम्हाला जास्त प्रिय आहे. जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज कुठल्याही कामात अपेक्षित यश मिळू शकतं. रविवारच्या सुट्टीमुळे घरात लहान मुलांचा गोंगाट असेल आणि खास पाहुण्यांच्या आगमनाने सर्वजण खूश होतील. तुम्ही कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या गरजा समजून घेतील आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. आज व्यावसायिकांना नवीन व्यवसाय ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: