आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला, वडील अजित पवारांकडून बैठकांचं सत्रच सुरु आहे. आई सुनेत्रा पवार या देखील छोटेखानी सभा-बैठका पार पाडत आहेत तर गेल्या दोन दिवसंपासून चुलत बंधू रोहित पवारही काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहे.
आता ही मंडळी जाहीर सभा, बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचतील. पण जी मंडळी खासकरुन तरुणवर्ग जो सभा आणि बैठकांपासून कोसो दूर राहून सोशल मीडियात गुंतलेला आहे, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी आता 'जय अजित पवार' खिंड लढवणार आहेत. सध्या ते सोशल मीडियावरील प्रचाराची रणनीती आखत आहेत. लवकरच ते प्रचारात सक्रिय झालेले पाहायला मिळतील.
पार्थ पवार यांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पीढी राजकारणात येत आहे. शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीसाठी माढ्यातून माघार घेतल्याचं सांगितलं. यानंतर पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.
VIDEO | पार्थ पवारांना ट्राफिकचा फटका, गाडी सोडून पळापळ
संबंधित बातम्या
कामातून जनतेला कायमस्वरुपी आपलंसं करुन दाखवलं पाहिजे, पार्थ पवारांचं ट्रोलर्सना उत्तर