जालना: मराठवाड्यातील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात मंगळवारी धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे फॅक्टरमुळे भाजपचे सामर्थ्याशाली नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव झाला. या जागेवरून काँग्रसचे नेते कल्याणराव काळे (Kalyan Kale) हे विजयी झाले आहेत. काळे यांनी दानवे यांचा 90 हजारपेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे.

जालना लोकसभेच्या निकालाचं धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे रावसाहेब दानवे यांना एकाही विधानसभा मतदारसंघातून (Vidhansabha Matdarsangh) आघाडी मिळालेली नाही. रावसाहेब दानवे यांचे होमग्राऊंड असलेल्या भोकरदनमधूनही कल्याण काळे यांचा लीड मिळाली. हा भाजपसाठी (BJP) मोठा धक्का मानला जात आहे.

शेवटी निवडणुकीचे चित्र बदलले

सुरुवातीला या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचे पारडे जड मानले जात होते. जालना जिल्ह्यातील निवडणूक एकतर्फी होते की काय, अशा शंका व्यक्त केल्या जात होत्या. पण ही जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली. कल्याणराव काळे यांच्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांच्या सभा झाल्या. त्यामुळे प्रचाराच्या दिवसांत काहीचे चित्र बदलल्याचे दिसले. शेवटी कल्याणराव काळे आणि रावसाहेब दानवे यांच्यात चुरशीची लढत होणार, असे मत व्यक्त केले जात होते.  मात्र, कल्याणराव काळे यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकत दानवेंना धक्का दिला.

जालना लोकसभा विधानसभानिहाय मतदान

जालना (विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -937562) रावसाहेब दानवे भाजप - 83166लीड कल्याण काळे- 10590

बदनापूर (विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -1029592) रावसाहेब दानवे भाजप - 81487लीड कल्याण काळे-21472

भोकरदन (विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -1000132) रावसाहेब दानवे भाजप - 99051लीड कल्याण काळे-962

सिल्लोड (विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -1010372) रावसाहेब दानवे भाजप - 73278लीड कल्याण काळे-27759

फुलंब्री(विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -1127202) रावसाहेब दानवे भाजप - 82864लीड कल्याण काळे-29856

पैठण(विधानसभा)1) कल्याण काळे काँग्रेस -95019 2) रावसाहेब दानवे भाजप - 67163लीड कल्याण काळे-27856

पोस्टल मते1) कल्याण काळे काँग्रेस -23932) रावसाहेब दानवे भाजप - 2130लीड कल्याण काळे-263

एकूण मते1) कल्याण काळे काँग्रेस -6078972) रावसाहेब दानवे भाजप - 497939

आणखी वाचा

राज्यात महायुतीच्या जागा कमी होणार ही कर्माची फळं, निसर्गाचाच नियम : मनोज जरांगे पाटील

जालन्यात दानवेंचा पराभव, मराठवाड्यात महायुतीला जबर धक्का, कोणत्या जागेवर कोणाचा विजय, कोण पराभूत?

एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला फटका, घटत्या जागांवर रावसाहेब दानवेंचे उत्तर; म्हणाले...