जळगाव: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले असून जामनेर तालुक्यातल्या मोहाडी ग्रामपंचायतीमध्ये (algaon Mohadi Gram Panchayat Election) गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील (CR Patil Gujarat BJP President) यांच्या कन्या भाविनी पाटील पाटील या सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. पण भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास विकास पॅनलला दहा पैकी केवळ तीन जागा मिळाल्याने पराभव पत्करावा लागला आहे. तर प्रतिस्पर्धी भाजपच्याच लोकशाही उन्नती पॅनलला दहापैकी सात जागांवर विजय मिळाला असून सरपंच पदावरही विजय मिळवला आहे. त्यामुळे सदस्यपदी विजयी होऊन देखील भाविनी पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. 


Jalgaon Mohadi Gram Panchayat Election: कार्यकर्त्यांची नाळ गिरीश महाजन यांच्यासोबत.... 


आमच्या कार्यकर्त्यांची नाळ भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत जोडली असल्याची प्रतिक्रिया लोकशाही उन्नती पॅनलचे प्रमुख शरद पाटील यांनी दिली. मोठे आव्हान समोर होतं, तसेच भाविनी पाटील यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात जनता नाराज होती त्यामुळे जनतेने आम्हाला पाठबळ दिले असून अखेर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढ्यात जनशक्तीचा विजय झाल्याचे मत शरद पाटील यांनी व्यक्त केलं आहे


Jalgaon Mohadi Gram Panchayat Election: भाविनी पाटील या आधी सरपंच 


या आधी भाविनी पाटील यांनी मोहाडी गावच्या सरपंच म्हणून कारभार पाहिला आहे. यंदाच्या निवडणुकीत सरपंचपदावर मागासवर्गीय आरक्षण राखीव असल्याने त्यांना संधी मिळाली नाही. असं असलं तरी त्यांनी स्वत:चं पॅनेल उभं केलं होतं. आपल्या काळात गावात केलेल्या विकास कामांचा संदर्भ देत त्यांनी मतदारांच्या मते देण्याचं आवाहन केलं होतं. 


नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये मूळच्या मराठी असणाऱ्या सीआर पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत भाजपला विक्रमी विजय मिळवून दिला. पण त्यांची त्यांच्या कन्या असलेल्या भाविनी पाटील यांना मात्र जळगाव जिल्ह्यातील मोहाडी गावात आपली कामगिरी राखता आली नाही. 


जळगावात निकालानंतर झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू 


ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर विजयी व पराभूत असे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येवून वाद होऊन हाणामारी व दगडफेक झाली. या  दगडफेकीत विजयी उमेदवाराच्या भावाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


ही बातमी वाचा :