Jalgaon City Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे, अशात सर्वात चर्चेचा विधानसभा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात (Jalgaon Vidhan Sabha Constituency) उमेदवारांना आपली कंबर कसलीय. या मतदार संघात आपल्याला काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. कारण भाजपाचे (BJP) विद्यमान आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलीय. तर भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या (Mahavikas Aghadi) जयश्री महाजन (Jayashree Mahajan) लढणार आहेत. तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे  कुलभूषण पाटील हे अपक्ष लढणार आहेत. या मतदारसंघातून सुरेश भोळे, जयश्री महाजन की कुलभूषण पाटील, मनसे डॉ. अनुज पाटील आहेर? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


भाजप गड कायम राखणार का?


जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर सुरेश भोळे यांनी अभिषेक पाटील (राष्ट्रवादी) यांचा 64846 मतांनी पराभव केला होता. भाजपला एकूण 113310 मते मिळाली होती, तर उपविजेत्याला 48464 मते मिळाली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात चुरशीची शक्यता आहे.


यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार!


यंदाची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकत्र लढले होते. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. 288 जागांच्या विधानसभेत भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले, पण तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून मतभेद निर्माण झाले. सत्तावाटपाच्या वादातून युती तुटली, त्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 2022 मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे संकट निर्माण झाले होते. 


हेही वाचा>


Jalgaon District Vidhan Sabha Election: जळगावातील 11 विधानसभा मतदारसंघांत कोण-कोणाला आव्हान देणार? कोणत्या पक्षाचं पारडं जड ठरणार?