Devendra Fadnavis On Amit Thackeray मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून माहीम विधानसभा मतदारसंघाची खूप चर्चा होताना दिसत आहे. तसेच माहीममध्ये अनेक राजकीय घडामोडी देखील घडल्याचे पाहायला मिळाले. 


मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तसेच शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सदा सरवणकर माघार घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम राहिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकरांना राज ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करावी अशी सूचना देखील दिली होती. यानंतर सदा सरवणकर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. परंतु राज ठाकरेंची भेट नाकारली. तु्म्हाला उमेदवारी मागे घ्यायची असेल तर, घ्या नाहीतर निवडणुक लढवा, असा राज ठाकरेंनी निरोप पाठवला. 


अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा का नाही?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?


सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी एकनाथ शिंदेंपासून देवेंद्र फडणवीसांनी देखील खूप प्रयत्न केले. मात्र सदा सरवणकरांची समजूत काढण्यास दोघांनाही अपयश आले. आता महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा का दिला नाही?, यावर देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. भाजप आणि अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहीम येथे अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यायचा होता, परंतु तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले की,  त्यांचा उमेदवार उभा न केल्यास ठाकरे गटाला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्हाला काहीही करता आले नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.


राज ठाकरेंची भावनिक साद- 


मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला. त्यात होत वाचा आणि थंड बसा मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा...1985 साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले ,त्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. लोकसत्ता, सामनामध्ये देखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचं विचार का आला तर याची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी केली. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली , अनेक आमदार झाले. पण यंदा जे आधी घडले नाही ते आता घडतंय, आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय, अशी भावनिक साद मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घातली.


संबंधित बातमी:


Raj Thackeray: सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर