प्रत्येक लोकसभा क्षेत्रात अवैध रोकड व तत्सम मौल्यवान वस्तूंबाबत माहिती एकत्रित करणे. या पैशांवर आणि मौल्यवान वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयकर अधिनियमनांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने आयकर विभागाला दिल्या आहेत.
आयकर विभागाने केलेल्या नव्या व्यवस्था
- निष्पक्ष निवडणूक पार पाडण्यासाठी आहोरात्र 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
- ताबडतोब कार्यवाहीकरीता मुंबईतील 6 लोकसभा निवडणूक क्षेत्रात QRT (quick response team) तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी या टीम्सचे नेतृत्व करतील. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर एक तासात कार्यवाही केली जाणार.
- मुंबई शहरातील सर्व विमानतळांवर तसेच हेलिपॅड्सवर आयकर विभागाचे स्पेशल स्क्वाड्स नियुक्त करण्यात आले आहेत.
- संशयास्पद माहिती आढळल्यास नागरिक 24 तास संपर्क करु शकतात. नागरिक व्हॉट्सॅपद्वारेदेखील माहिती देऊ शकतात
निःशुल्क क्रमांक (Toll Free)- 1800221510
दूरध्वनी क्रमांक - 022-22820562
Whatsapp Number - 9372727824
Email - cleanmumbaielection@income tax.gov.in