पुणे : पुण्यात तरुणीचा विनयभंग करुन तिच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास बाणेर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

पीडित तरुणी ही शिक्षिका आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. रविवारी पहाटे ती एका हॉटेलमधील पार्टीतून मित्राकडे दुचाकीवर जात होती. यावेळी दोघा तरुणांनी पाठलाग करुन तरुणीला मारहाण केली.

VIDEO | पुण्यात तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण



एका सोसायटीजवळ हा प्रकार घडत असताना तरुणीने मित्राला बोलावलं. त्यानंतर आरोपींनी तरुणीसह मित्रालाही बेदम मारहाण केली. यावेळी आपला विनयभंग केल्याचा दावा तरुणीने केला आहे. या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहेत.

या प्रकरणी 21 वर्षीय अविनाश धनकुडे आणि 22 वर्षीय शेखर कळमकरला अटक करण्यात आलीय. दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.