नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत. यावर आज स्वतः प्रियांका गांधी यांनी स्वतःचे मत सांगितले. प्रियांका म्हणाल्या की, राहुल गांधींनी मला वाराणसीतून निवडणूक लढण्यास सांगितले, तर त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे.
प्रियांका गांधी आज राहुल गांधी यांचा मतदार संघ असलेल्या वायनाडमधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रियांका स्वतःच्या उमेदवारीबाबत म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मला वाराणसीतून निवडणूक लढ असे म्हणाले तर मला खूप आनंद होईल. मी त्यासाठी तयार आहे.
मागील आठवड्यात एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा सहभागी झाले होते. या कार्यक्रमात वाड्रांनी प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले होते. तसेच प्रियांका मोदींना जोरदार टक्कर देऊ शकते, असेदेखील वाड्रा म्हणाले होते.
काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यापैकी कोणत्याही पक्षाने वाराणसीतून त्यांचा उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे प्रियांका गांधी विरोधी पक्षांकडून एकमेव उमेदवार म्हणून वाराणसीतून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु आहे.
प्रियांका गांधी आज वायनाडमधील पुलवामामध्ये शहीद झालेले जवान व्ही.व्ही. वसंत यांच्या कुटुंबियांना भेटल्या. तसेच केरळमधून युपीएससी उत्तीर्ण झालेली पहिली आदिवासी तरुणी श्रीधन्या सुरेशचीदेखील प्रियांका यांनी आज भेट घेतली.
राहुल मला म्हणाले तर मी वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक लढेन : प्रियांका गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Apr 2019 11:22 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी मोदींविरोधात वाराणसीतून निवडणूक लढतील अशा चर्चा सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -