नाशिक : यंदाच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या रंगाची उधळण तर होईलच पण त्यापूर्वी काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी बाजार सज्ज झाले आहे. मात्र यंदाच्या होळीच्या बाजारावर निवडणुकीच्या रंगाचा परिणाम पाहायला मिळतोय. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत 'प्रियांका वॉटर टँक' नावाची पिचकारी दाखल झाली आहे.

नाशिकच्या स्थानिक बाजारात प्रियांका गांधीच्या पिचकारीला मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर देशभरात नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मायावती यांच्या नावाच्यासुद्धा पिचकारी बाजारात पाहायला मिळत आहे. मात्र यंदा प्रियांकाच वरचढ ठरत आहे. 'प्रियंका वॉटर टँक'ची किंमत 250 रुपये आहे.

VIDEO | यंदाच्या होळीत 'प्रियांका वॉटर टँक'ची धूम | नाशिक | एबीपी माझा



मागील निवडणुकीत मोदी पिचकारी चांगलीच लोकप्रिय ठरली होती. यंदा मात्र प्रियंका पिचकारीची धूम पाहायला मिळतेय. तर प्रियांका वॉटर टँकलाही नागरिकांची चांगलीच मागणी पाहायला मिळतेय.

काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील एंट्रीनंतर काँग्रेसमध्ये नवं चैत्यन्य निर्माण झालं आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकांत मोदींची जागा प्रियांका गांधी घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

प्रियांका गांधींच्या टीममध्ये 'या' मराठमोळ्या चेहऱ्यावर महत्वाची जबाबदारी 

नंदुरबार लोकसभा : भाजपला मोदींच्या 'विकास तंत्राचा' तर काँग्रेसला 'प्रियांका अस्त्रा"चा आधार

दोन कोटी रोजगार आणि महिला सुरक्षेच्या आश्वासनांचं काय झालं? प्रियांका गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल