मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या घोषणेचा धसका घेत 'मैं भी चौकीदार' ही मोहिम उघडली आहे. नरेंद्र मोदींच्या या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी ट्विटरवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' असं लिहिलं आहे. मात्र गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेसमध्ये सामील झालेले हार्दिक पटेल यांनी 'चौकीदार' शब्दाला टक्कर देत ट्विटरवर आपल्या नावापुढे 'बेरोजगार' असं लिहिलं आहे.


त्यामुळे ट्विटरवर हार्दिक पटेल यांच नाव आता 'बेरोजगार' हार्दिक पटेल असं झालं आहे. हार्दिक पटेल यांच्या या मोहिमेची ट्विटरवर जोरदार चर्चा सुरु आहे.



राफेल कराराच्या मुद्यावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस सातत्याने पतंप्रधान नरेंद्र मोदींवर 'चौकीदार चोर है' असं म्हणत हल्लाबोल करत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींनी शनिवारी सोशल मीडियावर मैं भी चौकीदार ही मोहीम उघडली होती.


काही तासातच 'मैं भी चौकीदार' हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत होता. तसेच इतर सोशल मीडियावरही या मोहीमेची चर्चा होती. मोदींसह देशातील दिग्गज भाजप नेत्यांनी ट्विटरवर आल्या नावापुढे 'चौकीदार' लिहिलं होतं.



मात्र, चौकीदार शब्दाला बाजूला सारत नावापुढे 'बेरोजगार' लिहून हार्दिक पटेल यांनी देशातील मोठ्या समस्येला वाचा फोडण्याच प्रयत्न केला आहे. हार्दिक पटेल यांना उद्देश लक्षात आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण हार्दिक पटेल यांना पाठिंबा देताना दिसत आहेत.


संबंधित बातम्या


राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'ला मोदींचं उत्तर, #MainBhiChowkidar मोहीम सुरु


भाजपची टीम 'चौकीदार' सज्ज, मोदींसह भाजप नेत्यांंनी ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं