हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे कल हाती आले असून ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर (Nagesh Ashtikar) हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. नागेश आष्टीकर 10,000 मतांनी आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर (Baburao Kohalikar) पिछाडीवर आहेत. हा कल संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.
महाराष्ट्रातील इतर मतदारसंघाप्रमाणे हिंगोलीतील (Hingoli Lok Sabha Election Result 2024) जनतेलाही फोडाफोडीचं राजकारण रुचलेलं नाही. शिंदे गटाने हिंगोलीत बाबूराव कदम-कोहळीकर यांना तिकीट देऊन नवीन चेहऱ्याला संधी दिली. लोकसभेच्या गोंधळात खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागे घेतली आणि तिथेच त्यांचा डाव फसला.
हिंगोली लोकसभा निकाल 2024 (Hingoli Lok Sabha Election Result 2024)
उमेदवार | पक्ष | |
नागेश पाटील-आष्टीकर | शिवसेना ठाकरे गट | आघाडी |
बाबूराव कदम-कोहळीकर | शिवसेना शिंदे गट | पिछाडी |
2019 सालचा निवडणूक निकाल - (Hingoli Lok Sabha Constituency 2019 Result)
हेमंत पाटील (शिवसेना) - 5,86,312 मतं - विजयी
सुभाष वानखेडे (काँग्रेस) - 3,08,456 मतं
हिंगोलीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार म्हणून निवडून आले. या मतदारसंघात 2019 मध्ये 66.52 % टक्के मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील सुमारे 2,77,856 मतांनी विजयी झाले. हेमंत पाटील यांना 5,86,312 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना 3,08,456 मतं मिळाली.
ठाकरे गटाकडून शर्थीचे प्रयत्न
हिंगोली मतदारसंघात ठाकरे गटाने चांगलीच तयारी केली होती. निवडणुकीआधी सभा घेऊन ठाकरेंनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. रामदास पाटील सुमठाणकर यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांची उमेदवारी बदलावी आणि भाजपचा उमेदवार द्यावा, अशी मागणी केली होती. रामदास पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019 चे निकाल
महाराष्ट्रात 2019 मध्ये चार टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडली.ही निवडणूक यूपीए आणि एनडीएमध्ये लढली गेली. यूपीएमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती. एनडीएमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने अनुक्रमे 23 आणि 18 जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने 4 आणि काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. याशिवाय, एआयएमआयएमने एक जागा जिंकली आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यावेळी राज्यात 62.12% टक्के मतदान पार पडलं.
हेही वाचा: