Hingoli District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारच्या बच्चू कडूंची तिसरी आघाडी देखली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांनी वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. यामध्ये एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. तर एका मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी आमने सामने आली आहे. तर एका मतदार संघात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये लढत होणार आहे.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महाविकास आघाडी | महायुती उमदेवार | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1. | कळमनरी | संतोष टारफे | संतोष बागर | ||
2. | हिंगोली | रुपाली पाटील | तान्हाजी मुटकुळे | ||
3. | वसमत | जयप्रकाश दांडेगावकर | राजू नवघरे | ||
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार म्हणणारे संतोष बांगर नंतर शिंदेंच्या शिवसेत दाखल झाले होते. त्यामुळे संतोष बांगर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे यांना मैदानात उतरवले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठे यश मिळाले होते. त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर आहेत. शिंदेंनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत राहणार म्हणणारे संतोष बांगर नंतर शिंदेंच्या शिवसेत दाखल झाले होते. त्यामुळे संतोष बांगर यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे यांना मैदानात उतरवले आहेत. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठे यश मिळाले होते.
वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे वसमतमध्ये गुरु शिष्याचा सामना रंगणार आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे राजू नवघरे यांचे राजकीय गुरु मानले जातात. या गुरु शिष्यात लढाई होणार आहे. अजित पवार गटाकडून राजू नवघरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या