अहमदाबाद : पाटीदार समाजाचे नेते आणि नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या हार्दिक पटेल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरात न्यायालयाने त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. 2015 मध्ये गुजरातमधल्या मेहसाणातल्या भाजपा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या नियमानुसार ज्याला दोन वर्षांची किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली आहे तो निवडणूक लढवू शकत नाही.


भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी न्यायालयाने हार्दिक पटेल यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे हार्दिक पटेल यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.

हार्दिक पटेल गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. त्याला काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. परंतु न्यायालयाच्या दणक्यानंतर आता पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही.