Gujarat Himachal Pradesh ABP C voter Exit Poll Result Live : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळं आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. याच निकालाचा अंदाज घेण्यासाठी एबीपी माझा आणि सी वोटर्सनं ने केलेल्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत. या एक्झिट पोलमध्ये 1 डिसेंबर आणि पाच डिसेंबर म्हणजेच आज झालेल्या मतदानानंतर मतदारांचा कौल घेतला.  गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे. 


गुजरातमध्ये भाजपच्या जवळपास 35 जागा वाढताना या सर्व्हेचा अंदाज आहे तर काँग्रेसला जवळपास 40 जागांचा फटका बसतोय. तर सत्तेत येण्याचा दावा करत असलेल्या आपला 3 ते 11 जागा मिळतील असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी देखील भाजपची वाढली आहे. 


एक्झिट पोलचा अंदाज – गुजरात 2022


पक्ष                 2017  निकाल         एक्झिट पोल                    


भाजप –               99                     128-140


काँग्रेस –               77                       31-43


आप –                 00                       03-11


इतर  -               06                           02-06 


गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निकालाला अजून दोन दिवस बाकी आहेत. त्याआधी केवळ अंदाज याठिकाणी मांडण्यात आला आहे.


अशा पद्धतीनं केला आहे एक्झिट पोलसाठी सर्व्हे


गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. तर गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. आता या दोन्ही राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP माझासाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे.  या सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशात सर्व 68 जागांवर 18 वर्षांवरील 30 हजार लोकांची मतं घेण्यात आली आहेत. गुजरातमध्ये देखील एबीपी माझा आणि सी वोटर्सनं एक एक्झिट पोल केला. त्यात 1 डिसेंबर आणि आज 5 डिसेंबर रोजी मतदारांचा कौल घेतला. गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघातील 18 वर्षांवरील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे. या सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


हे देखील फॉलो करा


Exit Polls Results Live : गुजरात-हिमाचलमध्ये कोण बाजी मारणार? एबीपी माझा- सी व्होटरचा एक्झिट पोल लाईव्ह