Shivaji University : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या पदवी, पदविका आणि पीएचडी प्रमाणपत्रांसाठी अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. मार्च 2022 पूर्वी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जातील.


अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० रुपये शुल्क भरावे लागेल, तर उशिरा अर्ज भरणाऱ्यांना 580 रुपये भरावे लागतील. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जानेवारी आहे. डिप्लोमा, पदवीधर आणि पीएच.डी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 8 जानेवारी आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे की, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पात्रतेच्या वर्षाचा कोर्स कोड योग्यरित्या भरावा. 


परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ


दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर भाग 2 व 3 परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित तारखा विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत. विद्यापीठ हिवाळी सत्र परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुधारित तारखेनुसार महाविद्यालय, पदव्युतर अधिविभागात विद्यार्थ्यांना 10 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्ध‌तीने अर्ज करता येणार आहे. परीक्षा अर्ज 12 डिसेंबरपर्यंत approve करता येणार आहे. महाविद्यालयांनी विद्यापीठात परीक्षा अर्जाच्या याद्या 14 डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या