Gujarat Assembly Election 2022 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Election 2022) आम आदमी पक्षाचे (AAP) आव्हान झिडकारले असून, या निवडणुकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आप पक्ष आपले खातेही उघडू शकणार नाही, असा दावा केला. गुजरातमध्ये काँग्रेस (Congress) हा भाजपचा (BJP) प्रमुख प्रतिस्पर्धी आहे, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप'ने मोदींच्या गृहराज्यात आक्रमक प्रचार सुरू केला आहे.


'जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास'


अमित शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातचा सर्वांगीण विकास आणि अनेक धोरणाची अंमलबजावणी हीच प्रमुख कारणे गेल्या काही काळापासून लोकांचा मागील 27 वर्षांपासून भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय निश्चित आहे. जनतेचा आमच्या पक्षावर आणि आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.


'निवडणुकीत 'आप' खातेही उघडू शकणार नाही'


गुजरात विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या प्रवेशाबाबतच्या प्रश्नावर शाह म्हणाले, "प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण त्यांचा पक्ष स्वीकारला जातो की नाही, हे लोकांवर अवलंबून आहे. ते म्हणाले, गुजरातच्या जनतेच्या मनात 'आप' कुठेच नाही. निवडणुकीच्या निकालाची वाट पाहा, कदाचित यशस्वी उमेदवारांच्या यादीत 'आप'च्या उमेदवारांची नावे दिसणारही नाहीत.


'काँग्रेस अजूनही मुख्य विरोधी पक्ष'
काँग्रेसकडून  आलेल्या आव्हानाबाबत शाह म्हणाले, "काँग्रेस अजूनही मुख्य विरोधी पक्ष आहे, परंतु राष्ट्रीय पातळीवर संकटातून जात आहे आणि त्याचा परिणाम गुजरातमध्येही दिसून येत आहे."



19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहेत. हे सर्व जिल्हे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात अंतर्गत येतात. त्या सर्व जिल्ह्यांतील काही जागा अनुसूचित जाती किंवा समाजातील मागासवर्गीयांसाठी राखीव आहेत. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागांवर मतदान होणार असून, त्यापैकी सर्वसाधारण गटातील लोकांसाठी एकूण 68 जागा आहेत. समाजातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी फक्त 7 जागा राखीव आहेत.


महत्वाच्या बातम्या


Gujarat Elections 2022: पाकिस्तानने भारतात 2 बॉम्बस्फोट केले, तर तिथे 20 स्फोट होतील: हेमंत बिस्वा शर्मा