Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकांचं (Gujarat Assembly Election) बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगानं आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यांत गुजरात विधानसभेची निवडणूक (Assembly Election) पार पडणार आहे. तर हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीबरोबरच गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


2017 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?  


2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. भाजपनं 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता. पण निकालाअंती भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये केवळ 19 जागांचा फरक होता. बहुमत भाजपला मिळालं असलं तरी काँग्रेसनं भाजपला कडवी झुंज दिली होती, असं म्हणता येईल. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे यंदाही भाजप सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्ताचं ठरणार आहे. 


2017 मध्ये, गुजरातमध्ये 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान पार पडलं होतं. गुजरातमध्ये बहुमताचा आकडा 92 आहे. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी झालेल्या मतदानात 66.75 टक्के मतदान झालं होतं. तर, दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 68.70 टक्के मतदान झालं होतं. 




यंदा भाजपसमोर 'आप'चं आव्हान 


पंजाबपाठोपाठ गुजरात काबीज करण्यासाठी यंदा आम आदमी पार्टीनं कंबर कसली आहे. पंजाबमध्ये एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आप प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरात निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आपनं आतापर्यंत तब्बल 108 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. सध्या निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर करणारा आप हा एकमेव पक्ष आहे. 


दरम्यान, 18 फरवरी 2023 रोजी गुजरात विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. गुजरातमध्ये यंदा तब्बल 4.9 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 3.24 लाख नवे मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये 51782 पोलिंग स्टेशन असणार आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Gujarat Election 2022: अखेर गुजरात निवडणुकीचा बिगुल वाजला; दोन टप्प्यात होणार मतदान