Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Elections 2022) मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाला (AAP) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासोबतच आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी (Isudan Gadhavi) यांनाही आपली जागा वाचवता आली नाही आणि भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. 'आप'ने खंभलिया विधानसभा मतदारसंघातून इसुदान गढवी यांना उमेदवारी दिली होती आणि ते सुरुवातीपासूनच पिछाडीवर होते.


आम आदमी पार्टीचे हे दोन बडे नेतेही पराभूत 


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालात इशुदान गढवी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाच्या (AAP) इतर दोन मोठ्या नेत्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा अल्पेश कथिरिया आणि आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचाही पराभव झाला आहे. पाटीदारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वराछा विधानसभेच्या जागेवर आम आदमी पक्षाने पाटीदार आंदोलनाचा प्रमुख चेहरा अल्पेश कथिरिया यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी आपने गोपाल इटालिया यांना कटरगाम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.


काँग्रेसच्या व्होटबँकेत डल्ला


गुजरात निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला आहे, पण त्याचवेळी आम आदमी पक्षासाठी (आप) ही निवडणूक चांगलीच गाजली. निवडणुकीत भाजपला 53.33 टक्के तर आपला 12 टक्के मते मिळाली. त्याचवेळी आप ने आपला मताधिक्य वाढवून काँग्रेसच्या व्होटबँकेत डल्ला मारला आहे. निवडणूक आयोगाच्या (EC) दुपारी 12 वाजताच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसचा वाटा 26.9 टक्क्यांवर आला होता.


आम आदमी पक्षाला मोठा फायदा


गुजरात विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव होऊनही आम आदमी पक्षाने मोठा फायदा मिळाला आहे. ताकदीने निवडणूक लढणारा आम आदमी पक्ष आता राष्ट्रीय पक्ष होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी 5 जागांवर निवडणूक जिंकताना दिसत आहे. 'आप'ला 12.80 टक्के मतं मिळाली आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी 'आप'ला दोन जागा जिंकून सहा टक्के मते मिळणे आवश्यक होते, जे त्यांनी साध्य केले आहे. त्याच वेळी, मतमोजणी दरम्यान, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी दावा केला की गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होईल.


गुजरात निवडणुकीत भाजपचा विक्रमी विजय


संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 158 जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त 16 ते 20 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण होऊन बसलं.


इतर बातम्या


Gujarat Assembly Election 2022: गुजरातचे पुढील मुख्यमंत्री भुपेंद्र पटेलच; 12 डिसेंबर रोजी शपथविधी