Gujarat Assembly Election 2022: गुजरातमध्ये सातव्यांदा कमळ फुललं; काँग्रेसचा दारुण पराभव
Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही तास उरले आहे. यंदा कोण गुजरातचं मैदान राखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Gujarat Election: गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.
Gujarat Results 2022: गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडियामधून एकूण 23,713 मतांनी आघाडीवर आहेत.
Gujarat Election Result 2022 Live Updates: गुजरातमधील सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी म्हटलं की, "गुजरातच्या जनतेच्या मतांनी आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पक्ष होत आहे. राष्ट्रीय राजकारणात प्रथमच शिक्षण आणि आरोग्याच्या राजकारणाचा ठसा उमटत आहे. त्याबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन."
Gujarat Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार, गुजरातमधील सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
Election Results 2022 LIVE Updates: भाजप नेते आणि वीरमगाम मतदारसंघाचे उमेदवार हार्दीक पटेल केवळ 300 मतांनी आघाडीवर आहेत. येथे कँग्रेस उमेदवार आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे.
Gujarat Election Result 2022 Live updates: गुजरातमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार खालील उमेदवार आघाडीवर
- दर्शना वाघेला , भाजप
- पायल कुकरानी, भाजप
- कौशिक जैन, भाजप
- हार्दिक पटेल, भाजप
- नरेश व्यास, भाजप
- इमरान खेडावाला, काँग्रेस
- कनुभाई देसाई, भाजप
Election Results 2022 LIVE Updates: गुजरातमधील भाजप उमेदवार रिवाबा जाडेजा जामनगरमधून निवडणूक लढवत आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार रिवाबा जाडेजा आघाडीवर आहेत.
Gujarat Election Result 2022 Live updates: गुजरात निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजप (BJP) उमेदवार 133 जागांवर पुढे असून काँग्रेसही (Congress) 40 जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येते. तर, आम आदमी पक्ष (AAP) 5 जागांवर पुढे आहे.
Gujarat Election Result 2022 Live Updates: भाजप विक्रम मोडेल. भाजपला जास्तीत जास्त जागा आणि सर्वाधिक मतदानाची टक्केवारी मिळेल. आमचे सर्व उमेदवार त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठ्या फरकानं निवडून येतील. भाजपचा मोठा विजय होईल : भाजपचे उमेदवार पुर्नेश मोदी
Gujarat Election: गुजरातमध्ये आम आदमी पक्ष अजूनही केवळ 4 जागांवर आघाडीवर आहे. परंतु मतदान 19 टक्क्यांहून अधिक आहे. तसेच, भाजपची आतापर्यंतच्या मोजलेल्या मतांची टक्केवारी 52 टक्के आणि काँग्रेसची 30 टक्के आहे.
Gujarat Results 2022: गुजरातच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये घाटलोडिया मतदारसंघातून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आपली आघाडी कायम ठेवली आहे. गुजरातमध्ये भाजप 125 जागांवर आघाडीवर आहे. सुरतमध्ये भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे.
- भाजप : 126
- काँग्रेस : 51
- आप : 03
- इतर : 02
सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत. भाजप 100 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर
Gujarat Election Result Live: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं मुसंडी घेत 18 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे. आपनं एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Gujarat Assembly Election Result Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं होमग्राऊंड असलेल्या आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. आणि सत्तेत येण्यासाठी 92 ची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये भाजपनं बाजी मारली असली तरी प्रत्यक्षात भाजपला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचं आव्हान आहे. हे आव्हान भाजप मोडणार का? हे आज स्पष्ट होणार आहे. गुजरातप्रमाणे आज हिमाचल प्रदेश विधानसभेचाही निकाल आहे. 68 जागांच्या या विधानसभेत सत्तेत येण्यासाठी 35 ची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. हिमाचल प्रदेशात आजवर दर पाच वर्षांनी सत्ताबदल होत असतो. यंदा हा रिवाज कायम राहणार की भाजप पुन्हा सत्ता काबीज करणार याची उत्सुकता आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटात पहिले कल हाती येण्यास सुरुवात होणार आहे.
Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभेचं (Gujarat Assembly Election) मैदान कोण मारणार हे येत्या काही तासातच समजणार आहे. त्यावरच दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभेचा (Lok Sabha Elections) ट्रेंडही सेट होणार आहे. मोदी-शाहांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत भाजपशी (BJP) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टीची (Aam Aadmi Party) थेट लढत झाली आहे. त्यामुळे विजय कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
Himachal Pradesh Elections Result 2022: गुजरातसोबतच हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही आजच होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. गेल्या 37 वर्षापासून भाजप आणि कॉंग्रेसला अलटून पालटून सत्ता मिळाली आहे. एक्झिट पोलनुसार भाजप सत्तेच्या जवळ असल्याचं सांगितलं जातंय. तरीही दोन्ही पक्षात काटे की टक्कर होईल असा अंदाज आहे.
Gujarat Assembly Election 2022 LIVE: गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर कॉग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपनं भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्यानं कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे.
पार्श्वभूमी
Gujarat Assembly Election Result 2022 Live Updates: गुजरात विधानसभेचं (Gujarat Assembly Election) मैदान कोण मारणार हे येत्या काही तासातच समजणार आहे. त्यावरच दीड वर्षानंतर होणाऱ्या लोकसभेचा (Lok Sabha Elections) ट्रेंडही सेट होणार आहे. मोदी-शाहांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत भाजपशी (BJP) काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पार्टीची (Aam Aadmi Party) थेट लढत झाली आहे. त्यामुळे विजय कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
गुजरातमध्ये भाजपची 27 वर्षापासून सत्ता आहे. त्यातली 12 वर्ष स्वत: मोदीच (PM Narendra Modi) गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) होते. मात्र कोविडमध्ये (Covid-19) लोकांचे झालेले हाल, महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) या मुदद्यांमुळे ही इलेक्शन (Election) गाजली. मोदी (PM Modi) आणि शहांनी (Amit Shah) मिळून पन्नासहून अधिक सभा आणि रॅली केल्या. तरीही मतदारांचा उत्साह वाढला नाही.
गुजरातच्या 15 व्या विधानसभेच्या ((Gujarat Assembly Election LIVE) 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान झाले. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला विजय मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागांवर बीटीपी आणि एका जागा राष्ट्रवादी तर तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला 16 जागांवर फटका तर काँग्रेसच्या 16 जागा वाढल्या होत्या. या निवडणुकीत आपनं भाजप आणि काँग्रेसला थेट आव्हान दिल्यानं कोणाची डोखं दुखी वाढणार अशी चर्चा आहे.
गेल्या 27 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे (Gujarat Assembly Election Results LIVE) संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. निकालासाठी काही तास उरले आहेत त्यामुळे उमेदवारांची आणि भाजप, आप आणि काँग्रेस पक्षाची धाकधुक वाढली आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडली. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि या दोन्ही टप्प्यांचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलंय. तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आता भाजप गुजरातमध्ये गड राखणार की आप आणि काँग्रेस भाजपचा गड भेदणार हे उद्याच कळेल. एबीपी माझावर तुम्ही उद्या सकाळपासून या निकालाचं सुपरफास्ट कव्हरेज पाहु शकणार आहात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -