Space Law : अंतराळातील सूर्य (Sun) आणि चंद्र (Moon) या एकमेव गोष्टी आहेत, ज्या मानव पृथ्वीवरून स्पष्टपणे पाहू शकतात. तसं पाहायला गेलं तर, चंद्रावर अमेरिका आणि चीन या दोन देशांचा झेंडा आहे. पण, केवळ झेंडा लावून चंद्र त्यांच्या मालकीचा झाला का? याबाबत दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली, त्यांनी सांगितले, कोणत्याही देशाचा अशा प्रकारच्या मालमत्तेवर दावा नाही. मात्र प्रश्न असा आहे की, चंद्रावर झेंडा फडकावून मालमत्तेवर दावा करता येत नसेल, तर मग तो कोणाच्या मालकीचा आहे? जाणून घ्या अंतराळाशी संबंधित नियम

Continues below advertisement


प्रथम अंतराळ कायदा
ऑक्टोबर 1957 मध्ये, सोव्हिएत युनियनने जगातील पहिला उपग्रह स्पुतनिक-1 लॉंच केला होता. यानंतर सुमारे एका दशकानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने अंतराळ कराराचा मसुदा तयार केला. अंतराळाशी संबंधित हा पहिला कायदेशीर ऐवज होता. आजही, हा करार अवकाश कायद्यातील सर्वात उत्सुकतेचा भाग आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी आहेत. 


कोणताही देश दावा करू शकत नाही
मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ लॉ स्पेस तज्ज्ञ मिशेल हॅनलॉन म्हणतात की, या अवकाश करारामध्ये अंतराळातील जमीन ताब्यात घेण्याशी संबंधित नियम स्पष्ट केले आहेत. कराराच्या अनुच्छेद 2 नुसार, कोणताही देश अंतराळ किंवा खगोलीय क्षेत्राचा कोणताही भाग ताब्यात घेऊ शकत नाही. जगातील कोणताही देश चंद्रावर सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही. 


अंतराळात संपत्ती निर्माण करू शकता?
तर कराराच्या कलम 3 मध्ये असे नमूद केले आहे की, सर्व लोकांना अवकाशात मालमत्ता बाळगण्याचा मूलभूत अधिकार आहे. कोणताही मनुष्य चंद्रावर घर बांधू शकतो आणि तो स्वतःचा दावाही करू शकतो. अनेक लोक चंद्राच्या काही भागांच्या मालकीचा दावाही करतात. तथापि, कलम 12 मध्ये असे लिहिले आहे की, इतर कोणत्याही खगोलीय ग्रहावरील कोणत्याही प्रकारची स्थापना सर्वांकडून वापरात असायला हवी असं म्हटलंय.


सुशांत सिंग राजपूतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 2018 मध्ये चंद्रावर जमीन खरेदी केली होती. सुशांतने इंटरनॅशनल लूनर लँड्स रजिस्ट्रीमधून जमीन खरेदी केली होती. त्यांची ही जमीन चंद्राच्या 'सी ऑफ मस्कोवी'मध्ये आहे. ही जमीन 25 जून 2018 रोजी त्यांच्या नावावर झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या : 


OK Full Form : बोलण्यात प्रत्येक वेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे 'OK'; पण या शब्दाचा Full Form तुम्हाला माहित आहे का? नसेल तर आत्ताच वाचा