Goa Election 2022: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांनी आगामी गोवा विधानसभा निवडणूक  (Goa Assembly Election 2022) न लढवण्याचा निर्णय घेतलाय. राणेंचा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं त्यांना पोरियम मतदारसंघातून (Poriem Constituency) तिकीट दिलं होतं.  मात्र, याबाबत राणे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पण माजी मुख्यमंत्र्यांनी पक्षाला निवडणूक न लढवण्याचा निर्णय कळवला आहे, काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं स्पष्ट केलंय. 


राणेंच्या निकटवर्तीयांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंची सून देविया राणे यांच्याशी थेट लढत टाळण्यासाठी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. देविया राणे पोरियममधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. 87 वर्षाचे प्रतापसिंह राणा हे गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. ते पोरियममधून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 


“प्रतापसिंह राणे यांनी पोरियममधून निवडणूक लढवणार नसल्याचं पक्षाला कळवलंय. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या जागी दुसरा उमेदवार निवडलाय. राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पत्नी देविया राणे यांना भाजपनं पोरियममधून उमेदवारी दिली आहे, अशी माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्यानं दिलीय. प्रतापसिंह राणे पोरियमधून उमेदवारीसाठी काँग्रेसला पत्नी विजया देवी यांचे नाव सुचवू शकतात, अशी चर्चा होती. मात्र, गुरुवारी पक्षाने जाहीर केलेल्या सुधारित यादीत रणजित राणे यांना पोरियमधून काँग्रेसचे उमेदवार घोषित करण्यात आले.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha