Election 2022: देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून येत्या 10 मार्च रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. निवडणुकीच्या निकालापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांची ही बैठक जवळपास 30 मिनिटे चालली. सावंत यांनी एक्झिट पोलनंतरच्या राजकीय परिस्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली, असे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाले की, 10 मार्चला निकाल लागेल आणि गोव्यात भाजप 20 पेक्षा जास्त जागा जिंकेल. बहुतांश एक्झिट पोल हे गोव्यात भाजपाला अधिक जागा मिळणार, असं दर्शवत असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजपला प्रादेशिक पक्षाचा पाठिंबा मिळेल, असा दावा मुख्यमंत्री सावंत यांनी केला. प्रादेशिक पक्षांच्या मागणीबाबत केंद्रीय नेतृत्व आपल्या संपर्कात राहणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. गरज भासल्यास आम्ही एमजीपीचा आधार घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.
एबीपी न्यूज-सी व्होटरनुसार गोव्यात भाजपाला मिळणार इतक्या जागा
गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. एबीपी न्यूज-सी व्होटरनुसार गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असून त्याला 13 ते 17 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर काँग्रेसला 12 ते 16 जागा आणि आम आदमी पक्षाला 1 ते 5 जागा मिळू शकते.
2017 मध्ये काय होते निकाल
2017 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनूनही काँग्रेसला सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या. मात्र 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सत्ता काबीज केली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर एमजीपी 3 आणि इतर पक्षांनी 7 जागा जिंकल्या होत्या.
संबंधित बातम्या :