ABP Cvoter Goa Exit Poll Result 2022 : गोव्यात कुणालाही बहुमत मिळणार नाही, असा अंदाज एबीपी आणि सी वोटरने आपल्या सर्व्हेमध्ये व्यक्त केला आहे.गोव्यात सत्तेसाठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे.
भाजपला गोव्यात सर्वाधिक जागा मिळणार आहे. गोव्यात भाजपला 13 ते 17 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर कॉंग्रेसला 12 ते 16 जागा मिळणार आहे. आपला 1 ते 5, मगोपला 5 ते 9 आणि इतरांना 0 ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार मगोप किंगमेकरच्या भूमीकेत दिसणार आहे. आता मगोप कोणत्या पक्षाला पाठींबा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मगोप ज्या पक्षाला पाठींबा देणार त्या पक्षाचे राज्यात सरकार स्थापन होणार आहे. आप देखील निर्णायक भूमीकेत दिसणार आहे. आप कोणाला पाठींबा देते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2017 सालच्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. कॉंग्रेसने 17 जागा मिळाल्या होत्या परंतु सरकार बनवण्यात कॉंग्रेसला अपयश आले. गोव्यात 13 जागा मिळवणाऱ्या भाजपने एमजीपी, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तीन अपक्षाना सोबत घेत सत्ता स्थापन केली होती. आपला 2017 साली गोव्यात खाते उघडता आले नाही. तर एमजीपीला 3 आणि इतर पक्षांना सात जागा मिळाल्या होत्या.
गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. गोव्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 75.29 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
संबंधित बातम्या :
ABP Cvoter Exit Poll : पंजाबचा कौल आप पक्षाला, पाहा कुणाला मिळू शकतात किती जागा?
ABP Cvoter Exit Poll : उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेस चुरशीची लढत, पाहा काय सांगतोय एक्झिट पोल
Goa Exit Poll 2022 : गोव्यात त्रिशंकू स्थिती, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही