ABP-C Voter Opinion Poll| Goa Election 2022 :  पाच राज्यांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रचार आणि आरोपप्रत्यारोप चांगलेच रंगले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी गोव्यातील 40 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. पण, गोव्यात कुणाची सत्ता येणार? हे दहा मार्च रोजीच समजेल. पण त्याआधी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न पक्ष करत आहेत.

मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी दावे आणि वचनांचा पाऊस पडत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेय. त्यामुळे गोव्यात कुणाची सत्ता येणार, याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. भाजप पुन्हा गोव्यामध्ये सत्ता स्थापन करणार का? की गोव्यामध्ये सत्तापरिवर्तण होणार?  काँग्रेस अथवा आप सत्तेत येणार? गोव्याची जनता कुणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजने सी वोटरच्या साह्याने सर्व्हे केला आहे. यामध्ये गोव्यात कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याचे समोर आले आहे. 

 गोव्यात अटीतटीची लढत -
गोव्यात पुन्हा एकदा अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 40 पैकी 14 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 10 ते 14 जागा मिळू शकतात. त्याशिवाय आप पक्षाला 4 ते 8 जागा मिळू शकतात. तर एमजीपीला तीन ते सात जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य अथवा अपक्षांना 0 ते 2 जागा मिळू शकतात. 

गोव्यात कुणाला किती जागा?

एकूण जागा - 40

भाजप -14-18

काँग्रेस-10-14

आप- 4-8

MGP+  3-7

अन्य - 0-2

गोव्यात त्रिशंकु स्थिती?
गोवा विधनसभा निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सर्व्हेच्या अंदाजानुसार, गोव्यात त्रिशंकु स्थिती निर्माण होऊ शकते. सर्व्हेनुसार, गोव्यात सर्वाधिक मते भाजपला मिळू शकतात. गोव्यात भाजपला 30 टक्के मते मिळतील, तर काँग्रेस आणि आप पक्षाला प्रत्येकी 24 टक्के मते मिळतील. एमजीपी आणि मित्रपक्षाला 8 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 14 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

 गोव्यात कुणाला किती मते?

भाजप -30%

काँग्रेस-24%

आप-24%

MGP+  8%

अन्य - 14%

मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती?

   जानेवारी                   फेब्रुवारी
प्रमोद सावंत (भाजप)            33.5               30.4
अमित पालेकर (आप)          18.9                 19.5
विश्वजीत राणे (भाजप)      15.5  14.5
दिगंबर कामत (काँग्रेस)       8.6                  7.8

सूचना :  पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा प्रचार वेगाने सुरु आहे. थंडीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओपिनियन पोल सी-वोटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील  1 लाख 36 हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला आहे. 690 मतदारसंघामध्ये याबाबतचा अभ्यास केला. हा सर्व्हे 11 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकश सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.