Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ (Gadchiroli Chimur Lok Sabha) हा भारतीय राजकारणातील महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे. या मतदानाचा निकाल (Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result 2024) लागला असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे. (Maharashtra Political News) गडचिरोली चिमूर मतदारसंघातून कॉंग्रेसचे डॉ. नामदेव दासाराम किरसान हे 6,17,792 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे अशोक माधवराव नेटे यांचा पराभव केला आहे, नेटे यांना 476096 मत मिळाली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने अशोक नेटे यांना तिकीट दिल्यानंतर येथे भाजपाचा विजय झाला. काँग्रेसने नामदेव उसेंडी यांना तिकीट दिले होते, मात्र त्यावेळी ते विजयी होऊ शकले नाहीत. मात्र यंदा मोदींची लाट ओसरल्याचं चित्र दिसून येतंय.
गडचिरोली लोकसभा निकाल 2024 (Gadchiroli Lok Sabha Election Result 2024)
उमेदवाराचे नाव - पक्ष
डॉ. नामदेव दासाराम किरसान - 617792 कॉंग्रेस - विजयी
अशोक माधवराव नेटे - 476096 भाजप - पराभूत
हितेश मडावी - 15922- वंचित बहुजन - पराभूत
सर्वाधिक मतदान यंदा गडचिरोलीमध्ये
गडचिरोली चिमूर (Gadchiroli Chimur) मतदारसंघ हा विदर्भाचं शेवटचं टोक, आदिवासीबहुल, आणि नक्षलग्रस्त भाग अशी या मतदारसंघाची ओळख आहे. 2024 मध्ये मतदारराजाने कोणाच्या पारड्यात मत टाकलंय हे चित्र 4 जूनला स्पष्ट झालं आहे. या मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी यशस्वीपणे निवडणूक झाली होती. त्यावेळी 71.67 टक्के मतदान झाले होते. यंदा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील 2024 च्या उमेदवारांच्या यादीनुसार भारतीय जनता पक्षाकडून अशोक माधवराव नेटे (Ashok Nete), भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून डॉ. नामदेव दासाराम किरसान (Namdev Kirsan) आणि वंचित बहुजन आघाडीचे हितेश पांडुरंग मडावी (Hitesh Madavi) हे प्रमुख उमेदवार होते. गडचिरोली मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून हा 48 मतदारसंघापैकी एक आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर आणि आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यंदा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 71.67 टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 64.84 टक्के एवढे मतदान झाले होते.
कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?
आमगाव - सहसराम कोरोटे, काँग्रेस
आरमोरी- कृष्णा गजबे, भाजपा
गडचिरोली- देवराव कोळी, भाजपा
अहेरी- धर्मरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी कॉंग्रेस
ब्रम्हपुरी - विजय वडेट्टीवार, कॉंग्रेस
चिमूर-किर्तीकुमार (बंटी) भांगडिया - भाजपा
2019 सालचा निवडणूक निकाल - (Gadchiroli Lok Sabha Constituency 2019 Result)
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकांचे निकाल
वर्ष- 2019 : अशोक नेते (विजयी उमेदवार- भाजप) 45.05% मतं
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अशोक महादेवराव नेटे 5,17,722 मते मिळवून विजयी झाले होते.
तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
विजयाचा फरक: 77,336 मते.
वर्ष- 2014 : अशोक नेटे (विजयी उमेदवार- भाजप) 52.18% मतं
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे अशोक महादेवराव नेटे 5,35,616 मते मिळवून विजयी झाले होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
विजयाचा फरक : 2,36,640 मते.
या मतदारसंघाचे मागील लोकसभा निवडणुकीचे निकाल (लोकसभा 2019)
- अशोक महादेवराव नेटे भाजपा 5,17,722 46.52%
- डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 4,40,386 39.57%
- डॉ. रमेशुमार बाबुजा गजबे वंचित बहुजन आघाडी 1,10,736 9.95%
- हरिचंद्र नौजी मंगम बहुजन समाज पक्ष 28,006 2.52%
- देताना मोना नन्नावा अपोल पार्टी 16,090 1.45%
(लोकसभा 2014)
1 अशोक महादेवराव नेटे भाजपा - 5,35,616
2 डॉ. नामदेव दल्लुजी उसंदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 2,98,976
3 रामराव गोविंदा नन्नावा बहुजन समाज पक्ष - 66,877
4 डॉ. गजबे रामेशुमार बाबुजा आम आदमी पार्टी - 44,192
5 नामदेव आनंदराव कॅनकेक भारतीय कम्युनिस्ट पक्ष- 22,510
(लोकसभा 2009)
1 कोवेस मारतोराव सिनूजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 3,21,349
2 अशोक महादेवराव नेटे भाजपा - 2,92,645
3 आत्रम राजे सत्यवनराव बहुजन समाज पक्ष -1,35,500
4 दिनेश तुकाराम मदावी अपक्ष -25,857
5 नामदेव आनंदराव कॅनकेक भारतीय कम्युनिस्ट पक्ष - 22,999