Maharashtra Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. तर आज अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवत ही निवडणुक अधिक रंगतदार केली आहे. या निवडणुकांच्या रणधुमाळीत लातूर मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. सुधाकर शृंगारे यांनी 2024 साली भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला होता. याच पराभवाचे शल्य बोलून दाखवत शृंगारे यांनी आज वेगळा निर्णय घेत काँग्रेसची वाट धरली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखी एका माजी खासदाराने भाजपची साथ सोडल्याने लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
पराभवाचे शल्य बोलून दाखवत भाजपला रामराम
भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुधाकर शिंगारे यांना सहकार्य केलं नसल्यामुळे माझा पराभव झाला. हे शल्य सुधाकर शिंगारे यांनी यापूर्वी पक्षश्रेष्ठीकडे व्यक्त केलं होतं. मात्र जाहीर भूमिका कधीच घेतली नव्हती. मात्र आज त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
याआधी भाजप सोडलेले नेते
शायना एनसी - भाजपतून शिवसेनेत (शिंदे)
मुरजी पटेल - भाजपतून शिवसेनेत (शिंदे)
निलेश राणे - भाजपतून शिवसेनेत (शिंदे)
संजयकाका पाटील - भाजपतून अजित पवार राष्ट्रवादी
निशिकांत पाटील - भाजपतून अजित पवार राष्ट्रवादी
भाजपमध्ये बंडखोरी करणारे नेते
अमरावती - भाजपचे जेष्ठ नेते तथा माजीमंत्री जगदीश गुप्ता आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार....
बडनेरा - 1) भाजपचे नेते तुषार भारतीय महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
2) प्रिती बंड यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात उमेदवारी दाखल केली..
तिवसा - भाजपचे रविराज देशमुख महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार...
अचलपूर - भाजपचे प्रमोद सिंह गडरेल महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
दर्यापूर - 1) काँग्रेसचे गुणवंत देवपारे महाविकास आघाडी विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार..
2) भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले महायुती विरोधात बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टी कडून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला...
मेळघाट - भाजपचे प्रभूदास भिलावेकर महायुती विरोधात आज बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार.
इतर महत्वाच्या बातम्या