Vanchit Bahujan Aghadi list Of candidates : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (candidates) दहावी यादी (Third List) जाहीर करण्यात आली आहे. दहाव्या यादीत दोन उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. अकोला पश्चिममधून वंचितचा उमेदवार जाहीर झाला आहे. काँग्रेसनं मुस्लिम चेहरा दिल्यानंतर वंचितकडून देखील खेळी करत मुस्लिम चेहरा देण्यात आला आहे. सोबतच कारंजा लाड मधील उमेदवार देखील बदलला आहे.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाने आतापर्यंत आपल्या उमेदवारांच्या एकूण दहा याद्या जाहीर केल्या आहेत. या यादीत एकूण दोन जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत. अकोला पश्चिम येथून डॉ. झिशान हुसैन आणि कारंजा येथून सुनिल धाबेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोदात दिला उमेदवार
वंचितने आतापर्यंत 163 उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधातही उमेदवार दिला आहे. शिंदे त्यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. याच जागेवर प्रकाश आंबेडकर यांनी आशिष खंडेराव यांना तिकीट दिलं आहे. अजितदादांविरोधात बारामतीचा उमेदवार ठरला आहे. मंगलदास निकाळजे यांना बारामतीतून त्यांना उमेदवारी दिली आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडाळी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपामध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष हरीश आलिचंदानी आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे. अकोल्यातून भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना तिकीट दिल्याने आलिमचंदाणी नाराज होते . आलिमचंदाणी 28 वर्षांपासून पालिकेच्या राजकारणात आहे. महापालिका होण्याआधी दोनदा अकोल्याचं नगराध्यक्षपद भूषवलं . आलिमचंदाणी यांच्या आधी पक्षाचे 8 वर्षे शहराध्यक्ष असलेले आणि आता प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले डॉ.अशोक ओळंबे यांनी परवा पक्षाचा राजीनामा दिला होता. ओळंबे आज 'प्रहार'कडून भरणारा उमेदवारी अर्ज भरल आहे.
हे ही वाचा :