Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. राज्यभरातील मतदार मोठ्या उत्साहात मतदानासाठी बाहेर पडत आहे. याचदरम्यान वरळीत (Worli Vidhan Sabha) एक फेक मेसेज व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे. 


वरळीमध्ये मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, अशा प्रकारचे खोटं पत्रक वरळीमध्ये वाटत असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकारही समोर आला आहे. या व्हायरल पत्रानंतर मनसेचे काही पदाधिकारी आग्रीपाडा पोलीस स्टेशनला पोहचले.  तसेच वरळीमध्ये मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशा प्रकारचे खोटं पत्रक वरळीमध्ये वाटत असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला मनसे कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.


वरळीत व्हायरल होणाऱ्या फेक पत्रकांत नेमका मेसेज काय?


प्रति, प्रिय वरळीकरांनो, 


जय महाराष्ट्र आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्यात पोहोचलो आहोत. आपणांस मी सांग इच्छितो की, शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे, आणि त्याचेच दायित्व म्हणून मनसेने ठरविले आहे की, हिंदूंच्या मतांचे विभाजन रोखण्यासाठी वरळीत धनुष्यबाणाला पाठिंबा देऊन शिवसेनेला समर्थन देणार आहे. आपल्या मतांचा सन्मान करा आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्या... येत्या २० नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे, असं फेक पत्रक राज ठाकरेंच्या नावाखाली व्हायरल करण्यात येत आहे.


मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान-


विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ०९.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे-


विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)-   


१७८ धारावी - ०४.७१ टक्के  
१७९ सायन-कोळीवाडा  -  ०६.५२  टक्के  
१८० वडाळा –  ०६.४४  टक्के  
१८१ माहिम –  ०८.१४ टक्के
१८२ वरळी –  ०३.७८  टक्के  
१८३ शिवडी –  ०६.१२  टक्के 
१८४ भायखळा –  ०७ .०९ टक्के    
१८५ मलबार हिल –  ०८.३१  टक्के
१८६ मुंबादेवी - ०६.३४ टक्के 
१८७ कुलाबा - ०५.३५  टक्के  


संबंधित बातमी:


Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video