Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : राज्यात सर्वाधिक उलथापालथी आणि सर्वाधिक नाट्यमय घडामोडीने रंगलेल्या माढा लोकसभेला शरद पवार गटाने बाजी मारणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. टीव्ही नाईनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैरशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 






टीव्ही नाईनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी 25 जागा


लोकसभेच्या सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज एक्झिट पोल समोर आले आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली असून टीव्ही नाईन आणि एबीपी सीव्होटर सर्व्हेत महाविकास आघाडीसाठी राज्यामध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे चिन्ह आहे. टीव्ही नाईनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी 25 जागांवर विजयी होईल, अशी चिन्हे आहेत.  महायुती 22 जागांवरती मजल मारेल अशी चिन्हे आहेत. 






महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज


दुसरीकडे, एबीपी सी व्होटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील असा अंदाज आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा सुद्धा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ होता. या मतदारसंघाकडे सुद्धा राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिला आहे. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी आघाडी घेतली आहे. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभेतून आघाडीवर आहेत. 






इतकेच नव्हे, तर सातारा लोकसभेचा अंदाज आला असून सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. याठिकाणी भाजपकडून उदयनराजे भोसले रिंगणात आहेत. मात्र उदयनराजे यांच्या उमेदवारी घोषित करण्यात आलेल्या विलंबावरुन बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या उमेदवारीवरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. ज्या पद्धतीने शाहू महाराजांना सन्मानाने उमेदवारी देण्यात आली, त्याच पद्धतीने भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी टीका केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या